Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: हवालदाराने केली तरुणाची हत्या; नंतर मृतदेह पुरण्यासाठी केला 191 किलोमीटरचा थरारक प्रवास आणि…; कारण काय?

पत्नीच्या कथित संबंधांच्या संशयातून नवी मुंबईतील हवालदाराने तरुणाची हत्या केली. पुरावे लपवण्यासाठी मृतदेह 191 किमी दूर साताऱ्यात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 02:20 PM
कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईतील पोलीस हवालदारावर खुनाचा आरोप
  • पत्नीच्या संबंधांच्या संशयातून वाद वाढला
  • हत्या करून मृतदेह 191 किमी दूर साताऱ्यात नेला
  • विहिरीत टाकून जाळण्याचा प्रयत्न
नवी मुंबई: नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हवालदाराने तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरण्यासाठी तब्बल 191 किलोमीटरचा प्रवास केला. हवालदाराने सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे नेऊन मृतदेह जाळलं. पोलिसांना मृतदेह 6 फेब्रुवारी रोजी खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका शेतविहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा हवालदारानेच हत्या केल्याचे उघडलं झाले. मात्र हवालदाराने त्या तरुणाची हत्या का केली? कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस हवालदाराने एवढे टोकाचे पाऊल का उचलले! जाणून घ्या.

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

काय नेमकं प्रकरण?

6 फेब्रुवारी रोजी खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका शेतविहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांचा तपासात धक्कादायक बाब उघडली. मृत तरुण हा नवी मुंबईतील कळंबोली येथील रहिवासी होता. त्याचा संबंध रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार भिसे यांच्या पत्नीसोबत असल्याचे समोर आले.

191 किलोमीटरचा प्रवास

पोलिसांनी हवालदार भिसे यांच्यावर संशय आला. त्यांच्या पत्नीचे मृत व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा वाद सुरू झाला होता. भिसे याने मृत तरुणाला भेटायला बोलावले. त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी हवालदाराने मृतदेह कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसवला. कोणालाहा संशय येऊ नये म्हणून मृतदेह जिवंत माणसाप्रमाणे बसवून त्याने नवी मुंबई ते सातारा असा 191 किलोमीटरचा प्रवास केला. लोणंदमधील सुखेड परिसरात पोहोचल्यावर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला.

अर्धवट जळालेला मृतदेह…

मात्र, मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने त्याचा बनाव फसला. स्थानिकांना मृतदेह दिसताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतले. लोणंद पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तांत्रिक तपास केला. आरोपी आणि मृत व्यक्तीचे मोबाईल लोकेशन एकाच मार्गावर आढळले. महामार्गावरील टोल नाके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा मागोवा घेतला.

आरोपी अटकेत

संशय बळावल्यानंतर नवी मुंबईतून हवालदार भिसे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिसांनी अवघीय तीन दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसच जर गुन्हा करत असतील तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावे असे प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि…; ३ जणांनी केला सामूहिक बलात्कार, नागपूर हादरलं!

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नवी मुंबईत हत्या करून मृतदेह सातारा जिल्ह्यात नेण्यात आला.

  • Que: खुनामागील कारण काय?

    Ans: पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांच्या संशयातून वाद निर्माण झाला.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज, टोल नोंदी आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने.

Web Title: Navi mumbai crime constable kills young man then makes thrilling journey of 191 kilometers to bury body and what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
1

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी
2

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.