Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमांना सापळा रचून घेतले ताब्यात

०७.०५.२०२४ रोजी मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी या ठिकाणी व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्री करण्यासाठी आणून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 09, 2024 | 11:39 AM
व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमांना सापळा रचून घेतले ताब्यात
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : तारकर्ली येथे स्थानिक गुन्हा अधिवेशन शाखेच्या पथकाने सापळा रचून घराच्या बाजूला लपून ठेवलेल्या पाच किलो ७० ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटी सदृश्य पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. भारत सरकार तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडून वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकरीता विविध योजना आणि कायदे तयार करण्यात आलेले आहेत. वन्य जीवांच्या संरक्षणाकरीता शासकीय यंत्रणा नेहमीच प्रयत्न करीत असतात. परंतु काही समाज कंटक स्वतःचे आर्थिक लाभाकरीता संरक्षित प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करीत असल्याने त्यावर आळा घालण्याकरीता पोलीस दल तसेच वन विभागाकडून विशेष प्रयत्न करुन वेळोवेळी कारवाया करण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक दृष्ट्या संपन्न असून येथील समुद्र किनारे जलचराने समृदध आहेत. त्याचा फायदा पर्यटनासाठी होत आहे. परंतु समुद्रामध्ये वावरणाऱ्या संरक्षित जलचरांच्या अवयवांची तस्करी करण्याचा प्रयत्न काहींकडून होत असतो. यास प्रतिबंध करण्याकरीता परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले होते.

०७.०५.२०२४ रोजी मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी या ठिकाणी व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्री करण्यासाठी आणून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने तारकर्ली, वरचीवाडी ता. मालवण येथे सापळा रचुन ०१ संशईत इसमाला ताब्यात घेऊन त्याने राहत्या घरी बाजूला लपवून ठेवलेली ५ किलो ७० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दराप्रमाणे सदर व्हेल माशाच्या उलटीची किंमत ५ कोटी ७ लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर कारवाईमध्ये आणखीन एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींविरुध्द मालवण पोलीस ठाण्यात भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास मालवण पोलीस ठाण्याकडून सुरु आहे.

सदरची कारवाई श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग श्री कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. हेमचंद्र खोपडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री रामचंद्र शेळके, श्रेणी पोलीस उप निरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे यांनी केलेली आहे.

Web Title: A man who was smuggling whale vomit was caught in a trap sindhudurg malvan police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 11:39 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Malvan
  • Sindhudurg News Update

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
3

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.