crime (फोटो सौजन्य: social media)
नांदेडमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भरदिवसा दोन तरुणांनी तरुणीला जबरदस्ती उचलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेडच्या रेल्वे स्थानक परिसरात एकजण दुचाकी घेऊन तयार होता. तर दुसऱ्या व्यक्तीने तरुणीला ओढत नेत दुचाकीवर बसवलं. जबदस्तीने तिला उचलून नेल्याचं समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नांदेड पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरु आहे.
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल; अनेक वर्षांपासून होते प्रेम संबंध
लातूर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथे एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीचे अनैतिक संबंधातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २८ जुलै रोजी अहमदपूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव भीम उत्तम चव्हाण असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी भीम उत्तम चव्हाण आपल्या घरातील पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी ही माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ भीम यांना अहमदपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. त्यानंतर शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात भीमा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
मृतकाचा सख्खा भाऊ अर्जुन उत्तम चव्हाण यांनी अहमदपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत भीम यांची पत्नी कल्पना भीम चव्हाण आणि गावातीलच देविदास राजाराम चव्हाण या तरुणाशी गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याच कारणामुळे आपल्या भावाने मानसिक तणावातून गळफास घेतल्याचा आरोप केला आहे.
गुन्हा दाखल
फिर्यादीनुसार, अहमदपूर पोलिसांनी मृतकाची पत्नी कल्पना चव्हाण आणि देविदास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी, मृतकाच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे