कोळशेवाडी परिसरातील ओम सीता अपार्टमेंटमधील रेशनिंग दुकानाच्या मालकी हक्कावरून चार तासांपासून वाद सुरू आहे. केडीएमसीचे उपायुक्त समीर भूमकर, सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे आणि सचिन तामखेडे दुकान आणि घरांची मोजणी करण्यासाठी आले असता, सुशील दुबे कुटुंबीयांनी अडथळा निर्माण केला. या दरम्यान दुबे कुटुंबीयांनी पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना अरे रावी केली आणि मुलीने एका महिला कॉन्स्टेबलला नखाने मारले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही घटनास्थळी जमले असून प्रशासनाला वेठीस धरले आहे. या वादामुळे मराठी-परप्रांतीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.