Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा…’, पत्र लिहून पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नवविवाहित डॉक्टर महिलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्रामध्ये तिने पतीने छळ केल्याचा आरोप केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2024 | 04:53 PM
पत्र लिहून पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या (फोटो सौजन्य-X )

पत्र लिहून पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

महिनाभरापासून महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनाचे सत्र सुरुच आहे. बदलापूरची घटना ताजी आहे, त्यावरुन अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. हे सगळं असतानच छत्रपती संभाजीनगर येथील एका डॉक्टर महिलेने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांकडून पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीवरून ती पतीच्या छळामुळे नाराज होती आणि त्यामुळेच तिने आपला जीव संपल्याचे समोर आले आहे. हुंड्यासाठी पतीवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टरने तिच्या पतीवर आरोप केली आणि पत्रामध्ये म्हटले की, ‘तू नेहमी माझ्या चारित्र्यावर संशय घेतेले…’

ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली असून मृत महिला डॉक्टरचे नाव 26 वर्षीय प्रतीक्षा भुसारे असे होते. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होत्या. प्रतीक्षाचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षाने २४ ऑगस्ट रोजी दुपारी तिच्या एन-६ सिडको येथील भाड्याच्या घरात आत्महत्या केली. प्रतीक्षा ही पती आणि सासरच्यांसोबत तिथे राहत होती. आरोपी पती आणि घरमालकाने प्रतीक्षाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षाचा मृत्यू झाल्याचे आरोपी पतीला समजताच त्याने रुग्णालयातून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पती आणि त्याचे कुटुंबीय प्रतीक्षाच्या अंत्यविधीलाही गेले नव्हते.

प्रतीक्षाने तिच्या पतीवर छळ केल्याचा आरोप करणारी सात पानी चिठ्ठी लिहीली होती. या चिठ्ठीत घटनेसाठी तिने पतीला जबाबदार धरले. प्रतीक्षाने सांगितले की, तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, पैसे घेऊन तिचा छळ करायचा. मृताच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरांनी सात पानी चिठ्ठीत लिहीले होते की,

डिअर अहो,

खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय ( Doctor Suicide ) घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.

माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलंत त्याचं वाईट वाटलं
सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर एतर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.

तुमचीच
प्रतीक्षा

अशी चिठ्ठी लिहून प्रतीक्षा गवारे यांनी आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं आहे. पतीचा रोजचा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

Web Title: A women doctor ends her life after writing an emotional letter to her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 04:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sambhaji nagar
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू
1

गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त
3

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.