Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: पाणी मागून घरात शिरला अन्‌…; रिक्षाचालकाने वृद्धेचा गळा आवळून चोरले दागिने, विश्वासाला तडा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये ओळखीच्या रिक्षाचालकाने ६४ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न करत साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे काही तासांत आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 12:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आरोपी रिक्षाचालक ओळखीचा असल्याने घरात प्रवेश
  • गळा आवळून वृद्धेला बेशुद्ध केले
  • साडेसात तोळ्यांचे दागिने चोरी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळखीच्या रिक्षाचालकाने ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून त्यांच्या गळ्यातील साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे. ही घटना शिवाजीनगर परिसरात घडली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासत आरोपीला अटक केली आहे.

Mumbai: भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव आकाश माधव अंभोरे असे आहे. तो फिर्यादी सुनंदा अशोक (६४) यांना २०१८ पासून ओळखत होता. सुनंदा यांच्या पतीच्या निधनानंतर त्या एकट्या राहत होत्या. त्यांच्या आजारपणामुळे दवाखान्यात जाण्यासाठी त्या नेहमी आकाशच्या रिक्षेचा वापर करत होत्या. त्यामुळे त्यांचा विश्वास आकाशवर होता.

मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून आकाश रोज संध्याकाळी त्यांच्या घरी येत होता. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो त्यांच्या घरी आला. त्याने प्यायला पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी सुनंदाबाई स्वयंपाकघरात गेल्या, तेव्हा त्याने मागून येत रुमालाने त्यांचा गेला आवळला. श्वास कोंडल्याने त्या बेशुद्ध पडल्या.

काही वेळाने त्यांना शुद्ध आली. शुद्धीवर आल्यांनतर त्यांच्या गळ्यातील पाच टोळ्यांची ५३ मण्यांची रुद्राक्ष माळ आणि अडीच तोळ्यांची ८४ मण्यांची तुळशीमाळ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ नातेवाईकांना कळवून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला शोधायला सुरुवात केली. गुन्हे शाखा, जवाहरनगर आणि उस्मानपुरा पोलिसांची पथकेही तपासात सहभागी झाली. तांत्रिक तपासातून आरोपीचे लोकेशन कमळापूर फाटा परिसरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन पाहताच आरोपीने स्पोर्ट्स
बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी घसरल्याने तो खाली पडला. तरीही तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला गजाआड केले.

सहावीतील विद्यार्थ्यावर चार वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पीडित आणि अत्याचार करणारे विध्यार्थी हे सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. ही घटना एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये घडली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Crime: बाप-लेक दारूच्या नशेत; लेकाने पेट्रोल ओतले आणि…; पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर परिसरात.

  • Que: आरोपी कोण होता?

    Ans: पीडित वृद्धेला परिचित असलेला रिक्षाचालक.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तांत्रिक तपास करून काही तासांत आरोपीला अटक केली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime entered the house after asking for water and rickshaw driver strangled the old man and stole jewelry broke trust

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती,  ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज
1

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती, ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
4

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.