जालना: जालना जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. प्रल्हाद भगस असे या तरुणाचे नाव आहे. रात्री दहाच्या सुमारास त्याने स्वत:ला जाळण्याचा प्रयत्न केला.प्रल्हादने रस्त्यावर पळत असतानाच स्वत:ला पेटवून घेतले, ज्यामुळे मोठा भडका उडाला. काही स्थानिक तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता.
प्राथमिक माहितीनुसार, गावातील एका व्यापाऱ्यासोबत झालेल्या आर्थिक वादामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या प्रल्हाद भगस याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Bangladesh Politics: बांगलादेशात शेख हसीना आणि अवामी लीगवर संकट; निवडणुक लढवण्याची परवानगी नाही
गावातील एका व्यापाऱ्यासोबत झालेल्या आर्थिक वादातून प्रल्हादने स्वत:ला पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत तो सुमारे 50 टक्के भाजला आहे. जखमी अवस्थेत प्रल्हादला काही तरुणांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेला आहे. भरधाव जाणारा रेडिमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. दोन्ही विद्यार्थिनींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. ही घटना हिंजवडी – माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी याबाबत माहिती दिली.
Sanjay Raut On Kangana Ranaut: ‘हीच इंदिरा गांधींची खरी ताकद
प्रांजली आणि अश्लेषा या एमआयटी कॉलेजध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. हिंजवडी – माण रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ बेदरकारपणे वाहन चालवत भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. याचवेळी तेथून चाललेल्या दुचाकीस्वार प्रांजली आणि अश्लेषा या डंपरखाली सापडल्या. या भीषण अपघातात दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस, आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्याचे काम करण्यात आले. या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, २२ वर्षीय डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.