एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
आळंदी : आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित तरुणीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून अत्याचार केल्याची गंभीर तक्रार अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, 2 जून 2025 रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना, तिच्या ओळखीच्या महिला या तिला ‘शेतात चल’ असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या. वाटेत एका गाडीतून आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एक अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत नेण्यात आले. तेथे तिला एका खोलीत डांबून ठेवले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, अत्याचाराच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.
डोंबिवलीतही घडली होती घटना
दुसऱ्या एका घटनेत, 2015 मध्ये डोंबिवलीत एका क्रूर कृत्य समोर आला आहे. एका सख्ख्या भावाने बहिणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पीडितेला मिळणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचेही आदेश दिले आहेत.
पुण्यात वाढताहेत अत्याचाराच्या घटना
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सतत अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. आता पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका 40 वर्षीय नराधमाने एका ३७ वर्षीय विवाहित महिलेला धमकावत लग्नाची मागणी घालत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीने विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले. त्यानंतर काढलेले फोटो आणि व्हिडिओ तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. ही संतापजनक घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली आहे. पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे.