Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध

जलनिस्सारण प्रकल्पांतर्गत (टप्पा एक) सुरू असलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची, नियमबाह्य आणि संत गतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 11, 2026 | 07:53 PM
जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण!

जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण!

Follow Us
Follow Us:
  • जामखेडमध्ये जलनिस्सारण प्रकल्पांतर्गत कमाविरुद्ध राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण
  • कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची, नियमबाह्य आणि संत गतीने सुरू असल्याचा आरोप
  • जाणून घ्या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
जामखेड नगरपरिषद हद्दीतील जलनिस्सारण प्रकल्प (टप्पा एक) अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पातील कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची, नियमबाह्य आणि संथ गतीने सुरू आहेत. मंजूर अंदाजपत्रकातील तांत्रिक निकष व मापदंड न पाळता कमी दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गटार चेंबरसाठी करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या कामात गुणवत्तेचा अभाव दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

गटरलाइन टाकताना जुने सिमेंट रस्ते जेसीबी मशिनने फोडले जात असून, त्यामुळे शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाईप टाकल्यानंतर खणलेली जागा दीर्घकाळ बुजवली जात नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यांची दुर्दशा

गटरलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती मंजूर अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार पद्धतीने केली जात नसल्याने रस्त्यांची स्थिती आणखी बिकट झाली आहे. एका चेंबरपासून दुसऱ्या चेंबरपर्यंत टाकण्यात येणारे पाईप आवश्यक जाडी व दर्जानुसार नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

प्रकल्पाची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, हीच स्थिती कायम राहिल्यास निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण होणार नसल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या परिस्थितीचा थेट फटका जामखेड शहरातील हजारो नागरिकांना बसत आहे.

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

  • प्रकल्पाची तत्काळ तांत्रिक व वित्तीय चौकशी करावी.
  • दोषी ठेकेदार व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.
  • निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवून नव्याने मोजमाप करून गुणवत्तापूर्ण काम सुरू करावे.
या संदर्भातील निवेदनावर शहाजी राळेभात, इस्माईल सय्यद, राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, विभीषण धनवडे, वसीम सय्यद, संदीप राळेभात, इराक कुरेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Ahilyanagar news ncps indefinite hunger strike in jamkhed against under the water drainage project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
1

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
2

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
3

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
4

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.