गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पालख्या एकाच वेळी परतीच्या वारीत आळंदीत आल्यामुळे विशेष उत्साह दिसून आला. हजारो भाविक, वारकरी, शालेय विद्यार्थी, वारकरी संप्रदायातील शिक्षण घेणारी मुले आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी पालख्यांचे जल्लोषात स्वागत केले.
अत्याचाराच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारकऱ्यांसह योग केला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि राजेश पांडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
टाळ-मृदंगाचा निनाद, विणेचा झंकार आणि जयघोषाच्या लहरीत बेभान झालेल्या वारकऱ्यांनी फुगड्या, फेर, पारंपरिक खेळ खेळत हरिनामात लीन होऊन नृत्य केले. मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
Ashadhi Wari Solhala 2025 : संत ज्ञानेश्व महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज आळंदीहून प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वी पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
दरम्यान आज वारीची सुरुवात होत असतानाच देहू-आळंदी रस्त्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना देहू-आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली.
आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित दीपोत्सव, इंद्रायणी नदी पूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.