Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर कारची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू तर दोघी गंभीर जखमी

जळगावमधील चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड गावाजवळ भरधाव कारने तीन महिलांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी स्पीड ब्रेकर आणि सुरक्षा फलकांच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 02, 2026 | 02:09 PM
Accident News: चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर कारची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू तर दोघी गंभीर जखमी

Accident News: चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर कारची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू तर दोघी गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:
  • बिलाखेडजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू
  • अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर केले आंदोलन
  • अपघाती रसत्यावर स्पीड ब्रेकर, सुरक्षा फलक करण्याची ग्रामस्थांची मागणी
Jalgaon Accident News: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड गावाजवळ भरधाव कारने तीन महिलांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने मृत महिला कारमध्ये अडकून पडली होती. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

एका महीलेचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, बिलाखेड गावाजवळून महिला जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर तीनही महिला रस्त्यावर कोसळल्या. यातील एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर कारमधील परिस्थितीही गंभीर होती. मृत महिला कारमध्ये अडकून पडल्याने तिला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना प्रयत्न करावे लागले.

Mumbai Accident Malad: अपघातात महिला वकिलाचा मृत्यू; ७० वर्षीय चालकावर व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप,भाजप नगरसेवकाचा हस्तक्षेप

दोन महीलांची प्रकृती गंभीर
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातातील मृत महिलेची ओळख पटविण्याचे आणि घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले.

ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
या अपघातानंतर बिलाखेड गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संतप्त ग्रामस्थांनी चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

Beed Crime News: गायी-म्हशी खरेदीसाठी १० लाखांची मागणी; हुंड्याच्या छळाला कंटाळून बीडमधील २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

आंदोलनामुळे वाहतुक ठप्प
रस्त्यावर तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, वाहनचालकांना सावध करण्यासाठी सुरक्षा आणि सूचना फलक लावावेत, तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आंदोलनामुळे चाळीसगाव-मालेगाव मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

चर्चेने आंदोलन घेतले मागे
पोलिसांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. आवश्यक त्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, कारचा वेग किती होता आणि चालकाचा वाहनावरील ताबा कशामुळे सुटला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Accident news car hits three women on chalisgaon malegaon road one dies two critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.