Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: समृद्धी महामार्ग भीषण अपघात; ट्रॅव्हल्स-कंटेनरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

नागपूरवरून संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने एका कंटेनरला जोरदार धडक दिली असुन त्यामध्ये १० प्रवासी जखमी आणि एकाचा मृत्यू झाला आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 31, 2026 | 12:43 PM
Accident News: समृद्धी महामार्ग भीषण अपघात; ट्रॅव्हल्स-कंटेनरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

Accident News: समृद्धी महामार्ग भीषण अपघात; ट्रॅव्हल्स-कंटेनरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:
  • ट्रॅव्हल्स कंटेनरच्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू
  • समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  • १० प्रवासी गंभीर जखमी झाले असून,काहींची प्रकृती चिंताजनक
संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील अपघातांची भीषण मालिका थांबण्याचे नाव घेत नसून गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ आणखी एका अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघाताची नोंद झाली आहे. नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने अतिशय भरधाव वेगात जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या दुर्दैवी घटनेत ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून, इतर १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) असे या अपघातात प्राण गमावलेल्या दुर्दैवी ज्येष्ठाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन वेगाने जात असताना वैजापूर परिसरातील समृद्धी महामार्गावर चालकाचा वाहनावरील अचानक ताबा सुटला. चालक काही समजण्यापुर्वीच  भरधाव बस पुढे जाणाऱ्या मालवाहतूक कंटेनरवर जाऊन मोठ्या वेगाने आदळली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी घटनास्थळाकडे धावले. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा मोठा आक्रोश आणि प्रचंड गोंधळाचे वातावरण महामार्गावर निर्माण झाले होते.

लखनऊ: ड्रायव्हरच निघाला हत्यारा,साथीदारांसह पीडित व्यक्तीवर झाडल्या गोळ्या .; जमिनीच्या वादातून केली हिंदुत्ववादी नेत्याची हत्या

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. बसच्या ढिगाऱ्यात आणि तुटलेल्या भागांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना अनेक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी २ ते ३ प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिद दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात हा अपघात बसच्या अतिवेगामुळे आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचे समोर येत आहे. अपघाताची नोंद करून वैजापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. समृद्धी महामार्गावर सातत्याने वेगमर्यादेचे उल्लंघन केले जात असल्यामुळे असे प्राणघातक अपघात वारंवार घडत आहेत. या ताज्या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहनांचा अमर्याद वेग, लेन कटिंग आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Accident news samruddhi mahamarg accident one killed on the spot and 10 seriously injured in a collision between a travel bus and a container truck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 12:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.