Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: तरूणावर भर चौकात धारधार शस्त्राने वार; युवकाचा मृत्यू, पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे कृत्य

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली. वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2024 | 10:03 PM
Crime News: तरूणावर भर चौकात धारधार शस्त्राने वार; युवकाचा मृत्यू, पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे कृत्य

Crime News: तरूणावर भर चौकात धारधार शस्त्राने वार; युवकाचा मृत्यू, पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे कृत्य

Follow Us
Close
Follow Us:
तासगाव: तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय 24 या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकाराने वायफळे येथे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू  खोकर  यांनी घटनास्थळी व दवाखान्यात  भेट दिली व जखमींची विचारपूस केली.
हल्ल्यातील जखमींची नावे अशी : संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर अस्लम शिकलगार (सर्व रा. वायफळे, ता. तासगाव), आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे (दोघेही रा. कुची, ता. कवठेमहांकाळ). याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : वायफळे येथील फाळके कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळेला भांडणे झाली होती. भांडणाचे पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झाले होते. दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत चालला होता. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता. हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. दरम्यान, आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळे येथील बसस्थानक चौकात आले. त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला. त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्याच्या मामांची दोन मुलेही होती. या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बसस्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार (रा. वायफळे) यांच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केला. त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे.
दरम्यान, आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले. यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला. याचवेळी रोहितचे वडील संजय, आई जयश्री या मध्ये आल्या. त्यांनाही या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण केली. सर्वचजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकल वरून धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली. वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे. सीसीटीव्हीमधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हल्ल्यातील सर्व जखमींना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
 याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. दरम्यान, भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करत आहे.
जखमी आदित्यचा वाढदिवस..!
 या हल्ल्यातील मयत रोहित फाळके यांच्या मामांची आदित्य व आशिष ही दोन मुले कालच वायफळे येथे आली होती. आज (गुरुवारी) आदित्य याचा वाढदिवस आहे. सायंकाळी वाढदिवस आनंदात साजरा करण्याचे नियोजन फाळके कुटुंबीयांचे होते. रोहित, आदित्य व आशिष हे सर्वजण वायफळे येथील बसस्थानक चौकात थांबले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

Web Title: Accused attack on youth sharp weapons youth loss their life and 5 injured tasgaon crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 09:02 PM

Topics:  

  • Tasgaon

संबंधित बातम्या

‘शेतकऱ्यांच्या अश्रूंवर सरकारचे राजकारण’ तासगावातून रोहित पाटीलांचा थेट हल्लाबोल
1

‘शेतकऱ्यांच्या अश्रूंवर सरकारचे राजकारण’ तासगावातून रोहित पाटीलांचा थेट हल्लाबोल

पाऊस ओसरताच आजारांचा फैलाव; ‘या’ तालुक्यात ताप, डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले
2

पाऊस ओसरताच आजारांचा फैलाव; ‘या’ तालुक्यात ताप, डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
3

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी-सावळजला मुसळधार पाऊस; ओढे-नाल्यांना पूर, जनजीवन अक्षरश: विस्कळीत
4

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी-सावळजला मुसळधार पाऊस; ओढे-नाल्यांना पूर, जनजीवन अक्षरश: विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.