
अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांचा सश्रम कारावास
अचलपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला. अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय-१ चे न्यायाधीश आर. बी. रेहपाडे यांनी आरोपीला 20 वर्षांच्या सश्रम कारावासासह ५००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, न्यायालयाने कठोर शिक्षेद्वारे बालक अत्याचार प्रकरणांबाबत स्पष्ट संदेश दिला आहे.
१२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ही घटना घडली. पीडिता दळण घेऊन चक्कीकडे जात असताना आरोपी प्रदीप बाबू कास्देकर (वय २८, ता. धारणी) याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून दुचाकीवर जबरदस्ती बसवले. त्यानंतर तिला गावाबाहेरील जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या गंभीर प्रकरणाची नोंद धारणी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार, आरोपीविरोधात गुन्हाही दाखल होता. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रीना का. सदार यांनी अत्यंत गांभीर्याने करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
हेदेखील वाचा : Nashik Crime: शारीरिक संबंध नाही तर कुटुंब मरतील…; महिलेवर अत्याचार करत केली ५० लाखांची फसवणूक, भोंदूबाबा फरार
दरम्यान, सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. डी. ए. नवले यांनी एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर केले. फिर्यादी, पीडिता तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने विश्वसनीय मानत आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले. याप्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास, ५००० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी यांसारखी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा स्वतंत्रपणे भोगावयाच्या आहेत.
नाशिकमध्ये अत्याचाराची घटना
नाशिकच्या पाथर्डी गावातून एक धक्कदायक घटना समोर आली. जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेचे लैंगिक शोषण करून सुमारे ५० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनीं भोंदू बाबाला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.