Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Acid Attack: नाते तुटल्याच्या रागातून माजी मंगेतरचे बिघडले मानसिक संतुलन; दोन सख्या बहिणींवर फेकले ॲसिड आणि…

उत्तर प्रदेशातील हापूड येथे नाते तुटल्याच्या रागातून एका तरुणाने माजी मंगेतर आणि तिच्या बहिणीवर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही बहिणी गंभीररीत्या भाजल्या असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 30, 2026 | 12:51 PM
Acid Attack: नाते तुटल्याच्या रागातून माजी मंगेतरचे बिघडले मानसिक संतुलन; दोन सख्या बहिणींवर फेकले ॲसिड आणि...

Acid Attack: नाते तुटल्याच्या रागातून माजी मंगेतरचे बिघडले मानसिक संतुलन; दोन सख्या बहिणींवर फेकले ॲसिड आणि...

Follow Us
Follow Us:
  • नाते तुटल्याच्या रागातुन केला ॲसिडने हल्ला
  • अमली पदार्थांचे सेवन करत असल्याने तोडले होते नाते
  • झोपलेल्या अवस्थेत असलेल्या बहीणींवर फेकले ॲसिड
UP Acid Attack: देशात कायदेशीर कठोरता आणि कडक कायदे असुनही ॲसिड हल्ल्यांच्या घटना थांबताना दिसत नाही आहेत. उत्तर प्रदेशातील हापूड येथील ॲसिड हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने नाते तुटल्याच्या रागातून आपला माजी मंगेतर आणि तिची बहीण या दोघींवर ॲसिड हल्ला केल्याने त्या गंभीररीत्या भाजल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सिंभावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

मध्यरात्री घरात घुसून केला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष नावाचा आरोपी रात्री सुमारे तीन वाजता गावात आला. घरात झोपलेल्या दोन्ही बहिणींवर त्याने ॲसिड फेकले. हल्ल्यानंतर दोन्ही बहिणी गंभीररीत्या भाजल्या आणि घरात आरडाओरड सुरू झाली. कुटुंबीयांनी तत्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा: गर्भलिंग निदान प्रकरणात २५ लाखांची डील अन् ५.५ लाख घेताना दोन दलाल ACBच्या जाळ्यात; डॉक्टरने केला पोलिसांचाच गेम

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी हर्ष याला ताब्यात घेतले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना असे समोर आले की, हर्षचे एका युवतीसोबत लग्न ठरले होते. मात्र, तो मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती युवतीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी हे नाते तोडल्याचे सांगितले जात आहे. याच रागातून हर्षने युवतीच्या घरात जाऊन दोन्ही बहिणींवर ॲसिड फेकल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून घटनेच्या सर्व बाजूंचा तपास केला जात आहे.

ॲसिड हल्ल्याविरोधात कायदेशीर तरतुदी

भारतीय न्याय संहिता मधील कलम १२४ अंतर्गत ॲसिड हल्ल्याला गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानण्यात आला आहे. या कलमानुसार दोषीला किमान १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढवता येते. तसेच पीडित व्यक्तीच्या उपचारांचा खर्च भागविण्यासाठी योग्य दंडाची तरतूद आहे.
ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न केल्यास पाच ते सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी ॲसिड हल्ल्यातील पीडितांना तातडीचे प्राथमिक उपचार मोफत देणे बंधनकारक आहे. उपचार नाकारल्यास संबंधितांविरोधात फौजदारी कारवाईची तरतूद आहे.                                                                                                                                                                              राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी कायदेशीर सेवा योजना-२०१६’ अंतर्गत ॲसिड हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या वारसांना प्राधान्याने कायदेशीर मदत, आधार व सहकार्य दिले जाते.

Web Title: Acid attack former fianc loses mental balance over a broken relationship throws acid at two sisters and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.