संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच संघटना एकवटली
बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केवळ बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात वातावरण तापलं आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडने काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. अटक केल्यानंतर त्याला बीडमध्ये नेण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा केज न्यायालयात हजर करण्यात आले. केज येथे कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी 15 दिवसांच्या कोठडीची मागणी सीआयडीने कोर्टासमोर केली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत केज कोर्टाने वाल्मिक कराडला कोठडी सुनावली आहे.
त्यानंतर आता याच प्रकरणातील दुसरा आरोपी सुदर्शन घुलेचा सीआयडीने तपास सुरू केला आहे. सुदर्शन घुले हादेखील या हत्याकांडातला मुख्य आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदारही पसार झाले आहेत. वाल्मिक कराडसोबतच त्याच्या दोन साथीदारांचा सीआयडीकडून गेल्या 22 दिवसांपासून त्याचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडने सरेंडर केल्यानंतर आता सीआयडी सुदर्शन घुलेच्या मागावर आहेच. घुले सापडल्यास या प्रकरणातील आणखी काही खुलासेही समोर येतील, अशी शक्यता आहे.
Game Changer: अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘गेम चेंजर’ची ट्रेलर रिलीज डेट आणि
मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले. आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल याची संपूर्ण माहिती समोर येईल. त्यामुळे सीआयडी त्याच्या मागावर आहे.वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन पुण्यात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीआयडीची एक टीम सक्रीय झाली होती. पण सुदर्शन आणि त्याचे दोन साथीदार फरार झाल्यापासून त्यांचाही तपास सुरू आहे.
सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरफरार आहेत. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर तपास यंत्रणांनी या तीन आरोपींच्या तपासावर फोकस केला आहे. सीआयडीच्या टीमने सुदर्शन घुलेच्या टाकळी गावात आता आपला तळ ठोकला आहे. या तिघांचाही शोध घेण्यासाठी सीआयडीची टीम राज्यासह राज्याबाहेरही सक्रीय झाल्याची माहिती आहे.
कोरेगाव भीमा 207 वा शौर्यदिन; विजयस्तंभाला आकर्षक सजावट, अनुयायींचा जनसमुदाय लोटला
वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याला आणण्यात आले. केज येथे कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी 15 दिवसांच्या कोठडीची मागणी सीआयडीने कोर्टासमोर केली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत केज कोर्टाने वाल्मीक कराडला कोठडी सुनावण्यात आली
केज कोर्टात हजर करण्यापूर्वी वाल्मीक कराड याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कोर्टसमोर हजर करण्यात आले. त्यावेळेस पोलिसांकडून कोर्टाला वाल्मीक कराडला 15 दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले याचा शोध घेण्यासाठी वाल्मीक कराड यांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी कोर्टासमोर सांगितले. सरकारी वकील आणि वाल्मीक कराड यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाल्याचे पाहायला मिळाले.