फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ग्लोबल स्टार शंकर षणमुगम दिग्दर्शित ‘गेम चेंजर’ हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत सातत्याने काही माहिती समोर येत आहे. पण आता चित्रपट निर्मात्यांनी गेम चेंजरचा सिक्वेल रिलीज करण्याची अधिकृत घोषणा केली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जाणून घ्या गेम चेंजर चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे. त्याची चाहत्यांना अनेक काळापासून प्रतीक्षा आहे.
The most awaited announcement from #GameChanger is here! 💥
Get ready to witness the king in all his glory! 😎❤️🔥#GameChangerTrailer from 2.1.2025!Let The Games Begin!#GameChangerOnJanuary10🚁
Global Star @AlwaysRamCharan @shankarshanmugh @advani_kiara @yoursanjali… pic.twitter.com/DKbMYUS00X
— Sri Venkateswara Creations (@SVC_official) January 1, 2025
‘गेम चेंजर’ या चित्रपटात राम चरणसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कियारा पहिल्यांदाच एखाद्या साऊथ चित्रपटात दिसणार आहे, जेव्हापासून चित्रपटाचा ट्रेलर जाहीर झाला आहे, तेव्हापासून या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. हा चित्रपट पाहण्याची त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करून, गेम चेंजरच्या निर्मात्यांनी जाहीर केले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर 2 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:04 वाजता प्रदर्शित होणार आहे. चाहते आणि चित्रपट प्रेमींमधील उत्साह आणखी वाढवण्यासाठी, राम चरणचे एक प्रभावी पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये तो एका आकर्षित अवतारात दिसत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी या गेम चेंजरबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. त्याच्या उत्कृष्ट कलाकार, दूरदर्शी दिग्दर्शन आणि आकर्षक कथेसह, हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या आगमनाबरोबरच गेम चेंजरच्या रिलीजची चाहते प्रतीक्षा करत आहेत.