Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: संतापजनक ! अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बॉटलमध्ये टाकून विक्री; जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई

मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोला जिल्हा कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून 21 लाख 95 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 21, 2025 | 01:06 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोला जिल्हा कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई अकोल्यातल्या एमआयडीसी भागात व्हि.जे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर करण्यात आली आहे. या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूरवर्गाकडून मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, अशाप्रकारचं कामकाज सुरू होतं. गुन्हा दाखल करण्यात आला असून 21 लाख 95 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, उत्पादनस्थळावरून 8 कीटकनाशकेचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तर या तपासणीचा अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. ही कारवाई अकोला जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने केली असून या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

दरम्यान, अशाच एक प्रकार भिवंडीतून समोर आला आहे. बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत कारखान्याचा भांडाफोड केला आहे. अमूल बटर बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. तिथे दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने शांतीनगर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी १७ जुलैला करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरामध्ये बनावट अमूल बटरचे उत्पादन चालू असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी करणे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक काळू गवारे व पथकातील पोलिसांसह नागाव भागातील भुसावळ कंपाऊंड, कासिमपुरा एका कारखान्यावर धाड टाकली. त्याठिकाणी अमूल कंपनीचे 100 ग्रॅम तसेच 500 ग्रॅम वजनाचे बनावट बटर तयार करण्यात येत असल्याचे आढळले.

तिथे रिफाईंड पामोलिन तेल, रिफाईंड वनस्पती तेल, मीठ, तसेच बटर फ्लेवर टाकून हँड मिक्सर मशीनचा वापर करून बनावट बटर तयार करण्यात येत होते. त्याठिकाणी त्यावेळी जीशान मुस्ताक अन्सारी व मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अक्रम हे दोघे हा बनावट बटर बनवत होते. अन्नसुरक्षा अधिकारी करणे यांनी तेथील साहित्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन, त्याठिकाण हून एकूण 180 पाकिटे सह रिफाइंड पामुलीन तेलाचा 73.4 किलो तसेच वनस्पती तेलाचा 73.4 किलो साठा जप्त केलेला आहे.

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने माजवली दहशत; ‘आम्हीच इथले भाई’ म्हणत १० ते १२ वाहनांची केली तोडफोड

 

Web Title: Akola news outrageous expired pesticides sold in new bottles in akola district agriculture department takes major action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?
1

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप
2

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप

Chhatrapati Sambhajinagar:  पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी 14 जणांचे तोडले लचके; मनपाच्या पथकाचा कोणताही प्रतिसाद नाही
3

Chhatrapati Sambhajinagar: पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी 14 जणांचे तोडले लचके; मनपाच्या पथकाचा कोणताही प्रतिसाद नाही

Jharkhand Crime : नवऱ्याची रोज कटकट, संतापलेल्या बायकोने प्रायव्हेट पार्टच टाकला कापून आणि नंतर…
4

Jharkhand Crime : नवऱ्याची रोज कटकट, संतापलेल्या बायकोने प्रायव्हेट पार्टच टाकला कापून आणि नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.