Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत वाहनांवर बोगस ‘प्रेस’ आणि ‘पोलीस’ स्टिकर लावून त्यांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. तोतया पत्रकारांकडून अशा वाहनांचा वापर बारबालांच्या कथित अवैध वाहतुकीसाठी केला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 22, 2026 | 02:42 PM
नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Follow Us
Follow Us:
  • बोगस ‘प्रेस-पोलीस’ स्टिकरचा धुमाकूळ
  • बारबालांची अवैध वाहतूक
  • नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट
  • पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून सर्रास वाहतूक
सावन वैश्य, नवी मुंबई : नवी मुंबई शहरात आणि विशेषतः कोपरखैरणे परिसरात सध्या बनावट ‘प्रेस’ (पत्रकार) आणि ‘पोलीस’ स्टिकर्सचा गैरवापर करून बेकायदेशीर कामे करणाऱ्यांचे पेव फुटले आहे. कोपरखैरणे येथील बारबालांना बारमध्ये सोडण्यासाठी आणि तिथून परत आणण्यासाठी (पिकअप-ड्रॉप सर्विस) वापरल्या जाणाऱ्या खाजगी वाहनांवर सर्रासपणे ‘प्रेस’ किंवा ‘पोलीस’ असे नाव लिहून शहरात वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.(Navi Mumbai Crime)

काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे गावातील रांजणदेवी मंदिर परिसरात असाच एक प्रकार उघडकीस आला. एका मारुती इको वाहनाच्या (क्रमांक MH 46 N 5612) मागचा काचेवर ‘प्रेस’ असा स्पष्ट उल्लेख असल्याचे दिसून आले. या वाहनातून बारबालांची ने-आण केली जात होती. अशा प्रकारे इको, टाटा सुमो, क्वालीस, सेंट्रो यांसारख्या गाड्यांचा वापर करून बारबालांना सर्रास सुरक्षित वाहतूक पुरवली जात आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

पोलिसांच्या नाकाबंदीतून सुटण्यासाठी ‘प्रेस’चा ढाल म्हणून वापर

रात्रीच्या वेळी किंवा नाकाबंदी दरम्यान पोलीस तपासणीपासून वाचण्यासाठी या वाहनांवर ‘प्रेस’ किंवा ‘पोलीस’ असे स्टिकर्स लावले जातात. यामुळे नाकाबंदीत पोलीस अशा वाहनांना न थांबवता सोडतात, याचाच गैरफायदा हे चालक व बार मालक घेत आहेत.
यात सर्वात गंभीर बाब म्हणजे, काही नावालाच चालणाऱ्या ‘साप्ताहिक’ वर्तमानपत्रांचे संपादक अवघ्या ५०० ते १०००० रुपयांसाठी अशा गाडी चालकांना थेट वृत्तपत्राचे अधिकृत ओळखपत्र (आयकार्ड) बनवून देत आहेत. हे आयकार्ड दाखवून नाकाबंदीत पोलिसांवर दबाव आणला जातो.

लोकशाहीचा चौथा स्तंभ डागाळतोय; नागरिकांमध्ये संभ्रम

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र, अशा प्रकारे अनैतिक व बेकायदेशीर कामांसाठी ‘प्रेस’ या शब्दाचा आणि स्टिकरचा गैरवापर होत असल्याने समाजात खऱ्या व प्रामाणिक पत्रकारांची प्रतिमा मलीन होत आहे. गाव-गल्लीत, मंदिर परिसरात आणि रहिवासी भागात अशा संशयास्पद गाड्या उभ्या राहिल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे व चुकीचे वातावरण निर्माण होत आहे.

जर अशा वाहनांमधून भविष्यात एखादी दुर्दैवी किंवा गंभीर गुन्हेगारी घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नवी मुंबईतील नागरिक विचारत आहेत. आरटीओ आणि नवी मुंबई पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी या संपूर्ण प्रकारामुळे नवी मुंबईतील तोतया पत्रकारांचा सुळसुळाट आणि त्यांचा सुरू असलेला धुमाकूळ चव्हाट्यावर आला आहे.

आरटीओ व वाहतूक पोलीस

वाहनांच्या काचेवर बेकायदेशीरपणे ‘प्रेस’ किंवा ‘पोलीस’ लिहिणाऱ्या गाड्यांवर आणि नियमबाह्य पिकअप-ड्रॉप करणाऱ्या वाहनांवर त्वरित जप्तीची कारवाई करावी. नवी मुंबई पोलीस: पैशांच्या लालचेपोटी अनधिकृत आयकार्ड वाटणाऱ्या अशा साप्ताहिक संपादकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशा बनावट स्टिकरधारी वाहनांवर आणि त्यांच्या आडून चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय काय पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

Web Title: Fake press police stickers misused for illegal transportation of bar girls in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष
1

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा
3

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश
4

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.