Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Kalyan Crime: कल्याणमध्ये चोरीच्या संशयावरून कामावरून काढण्यात आलेल्या माजी कर्मचाऱ्याने तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने ४० लाख रुपयांच्या लुटीचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. कल्याण क्राईम ब्रँचने या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 21, 2026 | 06:25 PM
दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Follow Us
Follow Us:
  • तीन महिन्यांचा पगार न दिल्याचा राग
  • माजी कर्मचाऱ्याने रचला ४० लाखांच्या लुटीचा कट
  • सहा जण अटकेत
Kalyan Crime: कल्याणमध्ये तब्बल ४० लाख रुपयांच्या लुटीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कल्याण क्राईम ब्रँचला यश आले आहे. चोरीच्या संशयावरून कामावरून काढण्यात आलेल्या एका माजी कर्मचाऱ्याने तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने ही लूट घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून लुटीच्या रकमेपैकी ३६ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

बँकेत पैसे जमा करण्यासाठी जाताना लूट

ही घटना १५ सप्टेंबर रोजी कल्याण-आग्रा रोडवर घडली. फारूक अत्तार आणि त्यांचा एक साथीदार ४० लाख रुपये घेऊन बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जमा करण्यासाठी जात होते. याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्यांना रस्त्यात अडवले. आरोपींनी दोघांना खाली पाडून त्यांच्याकडील ४० लाख रुपयांची रक्कम हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पलायन केले. भररस्त्यात घडलेल्या या लुटीमुळे परिसरात खळबळ उडाली.

Karad Helgaon Murder Case: कराडच्या हेळगावात रस्त्याच्या वादातून कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; २८ वर्षीय तरुणाचा खून

क्राईम ब्रँचने सुरू केला तपास

घटनेनंतर बाजारपेठ पोलीस आणि कल्याण क्राईम ब्रँचने तपास सुरू केला. कल्याण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी शोहेब शेख या कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. या चौकशीत लुटीच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांचा तपास मुख्य संशयित समीर शेख आणि त्याच्या साथीदारांपर्यंत पोहोचला.

सहा आरोपींना अटक

पोलिसांनी या प्रकरणात समीर शेख, आफताब खान, शहनवाज अन्सारी, शोहेब शेख, मुजाहिद खान आणि शाहिद शेख या सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून लुटीच्या ४० लाख रुपयांपैकी तब्बल ३६ लाख रुपये हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याचा राग?

पोलिसांच्या तपासानुसार, मुख्य आरोपी समीर शेख हा उल्हासनगर येथील क्रांती फूड या दुकानात काम करत होता. त्याच्यावर चोरीचा संशय घेत त्याला कामावरून काढण्यात आले होते. त्यावेळी त्याचा तीन महिन्यांचा पगारही देण्यात आला नसल्याचा दावा आहे. याचाच राग मनात धरून समीरने दुकानदाराला लुटण्याचा कट आखल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

पैशांच्या ने-आणीची होती माहिती

समीरने संबंधित दुकानात काम केले असल्यामुळे दुकानातील आर्थिक व्यवहारांची त्याला माहिती होती. दुकानातून किती रक्कम बाहेर नेली जाते, पैसे बँकेत कधी जमा केले जातात आणि ते कुठे नेले जातात, याची माहिती त्याच्याकडे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याच माहितीचा वापर करून त्याने साथीदारांच्या मदतीने नियोजन केले आणि पैसे बँकेत जमा करण्यासाठी नेले जात असतानाच लुटीचा कट अंमलात आणल्याचा पोलिसांचा दावा आहे.

४० लाखांपैकी ३६ लाख परत मिळवण्यात यश

घटनेनंतर वेगाने तपास करत पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आणि त्यांच्याकडून ३६ लाख रुपये हस्तगत केले. उर्वरित रक्कम आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण क्राईम ब्रँच आणि बाजारपेठ पोलीस करत आहेत. आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

Web Title: Kalyan 40 lakh robbery former employee six accused arrested 36 lakh recovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • police

संबंधित बातम्या

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
1

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.