मुंबई: बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. तळोजा कारागृहातून नेत असताना मुंब्रा बायपास य़ाठिकाणी त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर गोळीबार केला, यातच त्याचा मृत्यू झाला. आज मुंबईतील जेजे रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण याघटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
पण मुंब्रा बायपासवर नेमकं काय झालं, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अधिकारी अक्षय शिंदेला तळोजा तुरूंहातून बदलापूर गुन्हे शाखेला घेऊन जात होते. पोलिसांची कार मुंब्रा बायपासवर पोहचली असता अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकवून त्यांच्यावर गोळीबार केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्यापायाला गोळी लागली. अक्षय पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याने इतर पोलीस अधिकाऱ्यांवरही गोळीबार कऱण्याचा प्रयत्न केला पण पोलीस निरीक्ष संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळीबार केला. यात त्याला तीन गोळ्या लागल्या. तो गंभीर जखमीही झाला. त्याला उपचारासाठ रुग्णालयात दाखल करण्याता आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा: बारीक आणि कमी वजनाने त्रस्त आहात? मग आहारात ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचे नाव संजय शिंदे असं आहे. माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबतही संजय शिंदे यांनी काम केले आहे. संजय शिंदे यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी विभागातही काम केलं आहे.
हेही वाचा: ‘आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके सुपारीबाज माणूस, मालकाचा जसा आदेश येईल…’
दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरसाठी बदलापुरात जल्लोष होत असताना दुसरीकडे अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.” माझा मुलगा रस्ता ओलांडतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार कसा करू शकतो. जाणीवपूर्वक त्याला मारण्यात आल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. त्याचबरोबर, बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काऊंटर कऱण्यात आला का, असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. तर अक्षय शिंदे हा काही साधुसंत नव्हता, त्याने पोलिसांची बंदून हिसकावून गोळीबार केला, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांना त्याच्यावर गोळी झाडावी लागली, अस सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे.