फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी आग्रही भूमिका घेतली जात आहे. असे असताना ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंनी देखील जोर धरला आहे. यावरूनच शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला लक्ष्मण हाके हा भाडोत्री माणूस असल्याची टीका केली.
हेदेखील वाचा : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद मिळूनही गोगावलेंनी पदभार का स्वीकारला नाही ?
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी उपोषणाला बसले असताना त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहे. यावेळी जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फूस असल्याचा आरोप हाके यांनी केला होता. यावर शिंदे गटाकडून हाकेंना जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे.
संजीव भोर पाटील म्हणाले, ‘लक्ष्मण हाके हा भाडोत्री माणूस असून, मालकाचा जसा आदेश येईल, तसा तो बेछूट आरोप करत आहे. लक्ष्मण हाके या माणसाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्याआधी स्वतःची लायकी व पात्रता तपासून पाहिली पाहिजे’.
ओबीसींचा पुळका का ?
हाके हे सतरा नेत्यांचे आणि पक्षांचे उंबरठे झिजवून आलेत. आता ओबीसीचा कैवार दाखवत आहेत. हाके ज्या समाजातून येतात, तो धनगर समाज एसटीमधून आरक्षण मागत असताना तिथे हे संघर्ष करत नाहीत, त्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. इकडे ओबीसींचा पुळका आल्याचे दाखवून भांडणे उकरून काढण्याचे काम ते करतात. लक्ष्मण हाके हा सुपारीबाज माणूस आहे. दोन समाजात भांडणे लावण्यासाठी त्यांना भाडोत्री घेतले आहे, असा आरोप संजीव भोर पाटील यांनी केला.
हेही वाचा: एअर मार्शल अमर प्रीत सिंग होणार भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; जाणून घ्या त्यांच्या इतर कामगिरी