वजन वाढवण्यासाठी 'या' पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन
जगभरात अनेक लोक वाढलेल्या वजनाने त्रस्त आहेत, तर काहींचे कितीही खाल्ले तरीसुद्धा वजन वाढत नाही. वजन वाढले तरीसुद्धा आरोग्याला त्रास होतो आणि वजन कमी झाले तरीसुद्धा आरोग्य बिघडून जाते. वजन वाढवण्यासाठी अनेक लोक आहारात बदल करून हाय प्रोटीन पदार्थांचे सेवन करतात. तर काही लोक आहारतज्ञांकडून डाईट घेऊन आहारात बदल करतात. पण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा वजन वाढले नाहीतर जीम जाऊन व्यायाम केला जातो. हे सर्व उपाय करण्याऐवजी तुम्ही आहारात बदल करून वजन वाढू शकता. यासाठी आहारात तुम्ही चिया सीड्सचे सेवन करू शकता. चिया सीड्स आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत.
चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच चिया सीड्समध्ये प्रोटीन, फायबर इत्यादी आंबेक घटक आढळून येतात. चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मँगनीज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात तुम्ही चिया सीड्सचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला वजन वाढवण्यासाठी आहारात चिया सीड्सचे सेवन कसे करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रक्तातील घाण कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पाण्याचे सेवन
वजन वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन
कमी झालेले वजन वाढवण्यासाठी आहारात तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. दह्यासोबतच तुम्ही आहारात चिया सीड्स सुद्धा खाऊ शकता. एक वाटी दह्यामध्ये अर्धा चमचा चिया सीड्स टाकून खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.
वजन वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन
अनेकांना नुसतीच फळ किंवा भाज्या खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही फळे, भाज्या आणि इतर पदार्थांपासून स्मूदी बनवू शकता. स्मूदी बनवल्यानंतर त्यात अर्धा किंवा एक चमचा चिया सीड्स टाकल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. कमी झालेले वजन झपाट्याने वाढू लागेल. स्मूदीमध्ये प्रोटीन पावडर, स्पिरुलिना इत्यादी पावडरमध्ये प्रोटीन आढळून येते. पण केमिकल युक्त प्रोटीन पावडरचे सेवन करण्यापेक्षा हेल्दी आणि नैसर्गीक पदार्थांचे सेवन करावे.
हे देखील वाचा: डेंगू असल्यास प्या या फळाच्या पानांचा रस
वजन वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन
वजन वाढवण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात गुलकंद आणि चिया सीड्सचे सेवन करू शकता. चिया सीड्समध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा -3 फॅटी असिड आढळून येते. तसेच गुलकंद आणि चिया सीड्सचे एकत्र सेवन केल्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. तसेच सॅलेड किंवा इतर ज्युस बनवल्यानंतर तुम्ही त्यात चिया सीड्स टाकू शकता.