JIO (फोटो सौजन्य: PINTEREST)
काही प्लॅनमध्ये ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते, तर अनेक प्लॅनमध्ये मोफत क्लाउड स्टोरेज दिले जाते. अशाप्रकारे, प्रीपेड रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांसाठी आणखी फायदेशीर बनवले जात आहे. सध्या, जिओ त्यांच्या अनेक प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा देण्याचा निर्णय घेत आहे. चला त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Xiaomi चा सर्वात पॉवरफुल प्रोसेसरचा 5G फोन, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह चाहत्यांसाठी धमाका!
वापरकर्त्यांना काही प्लॅनमध्ये ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते, तर अनेक प्लॅनमध्ये मोफत क्लाउड स्टोरेज दिले जाते. परंतु एवढं सगळं देऊन सुद्धा वापरकर्ते अजूनही एका अतिशय महत्वाच्या गोष्टीच्या मागे धावतात, ती म्हणजे मोबाईल डेटा. बरेच फायदे देऊनही, आजकाल वापरकर्ते बहुतेकदा अशा प्लॅनकडे आकर्षित होतात जे जास्त डेटा देतात. याचे कारण म्हणजे प्रत्येकाला घरून काम करावे लागते. मुलांना अभ्यास करावा लागतो, ऑनलाइन चित्रपट, मालिका इत्यादींसाठी मोबाइल डेटाची आवश्यकता असते. लोकांची ही गरज पाहून, जिओने त्यांच्या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त मोफत डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे. चला कोणत्या प्लानमध्ये मिळत आहे 20GB एक्स्ट्रा मोबाइल डेटा जाणून घेऊया.
कोणत्या प्लानमध्ये मिळत आहे 20GB एक्स्ट्रा मोबाइल डेटा?
जिओ त्यांच्या लोकप्रिय 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त मोबाइल डेटा देखील देत आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना दररोज 2GB मोबाइल डेटा आणि २० जीबी अतिरिक्त डेटा मोफत मिळत आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग,100 मोफत SMS आणि अमर्यादित 5G मोबाइल डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवस आहे.
जिओच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनमध्ये अधिक फायदे उपलब्ध
इतकेच नाही तर जिओच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशन अंतर्गत, प्लॅनमध्ये २ महिन्यांसाठी जिओहोमची मोफत ट्रायल देखील दिली जात आहे. JioHotstar मोबाईल आणि टीव्ही सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.
रिलायन्स डिजिटल वरून निवडक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यावर 399 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. तसेच, जिओसावन, झोमॅटो, नेटमेड्सची सदस्यता देखील उपलब्ध आहे. 50GB मोफत JioAICloud स्टोरेज देखील उपलब्ध आहे.
555 रुपयांच्या प्लॅन
कंपनी 555 रुपयांचा गेमिंग प्लॅन देते. यामध्ये वापरकर्त्यांना JioGames Cloud, BGMI कूपन, Fancode, JioAI Cloud JioTV मोफत दिले जाते. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटासह 5GB मोबाइल डेटा अतिरिक्त उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.
यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मोफत एसएमएस सुविधा देखील देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये जिओ ९व्या वर्धापन दिन ऑफरचे सर्व फायदे देखील उपलब्ध आहेत.
749 रुपयांच्या प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 2GB दररोज डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 फ्री SMSची सुविधा मिळते. सध्या या प्लॅनमध्ये 20GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे.
त्याची वैधता 72 दिवस आहे. इतर दोन प्लॅनप्रमाणेच, हे जिओ ९व्या वर्धापन दिनाच्या ऑफर्ससह देखील येते. सध्या,या रिचार्जसह वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळू शकतात.
Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? घाबरू नका! फक्त 3 मिनिटांत करा योग्य ते बदल