amravati (फोटो सौजन्य: social media)
अमरावती जिल्ह्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. कुलरचा शॉक लागल्याने आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्य झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे ही घटना घडली. कुलरमध्ये पाणी टाकतांना हा विद्युत शॉक लागलायचे समोर. सुमती लक्ष्मण कासदेकर (वय 35) श्वेता लक्ष्मण कासदेकर (वय 4) आणि विकी लक्ष्मण कासदेकर (वय 3) असे मृतांची नावे आहेत.
Ichalkaranji Crime: पूर्ववैमनस्यातून रागाच्या भरात मित्राचा खून; संशयित पोलीसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण कासदेकर कामावरून आल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. तोपर्यंत याबाबत कोणालाच काही माहिती नव्हते. या घटनेनंतर सरमसपुरा पोलीस घटनास्थळी रावण झाले आहेत. दुसऱ्या खोलीत असलेली चार मुलं ही बचावली आहेत. लक्ष्मण कासदेकर यांना एकूण सहा अपत्य होती. दरम्यान, एकाचवेळी आईचा आपल्या दोन चिमकल्यांसह मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.
मुंबई हादरली! नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसोबत गेली, विरोध करणाऱ्या बापालाही संपवलं, नंतर भावाला…
मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका ३७ वर्षीय तरुणी ने आपल्याच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा काटा काढला. तरुणीच्या वडिलांनाही अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणातून हत्या केल्याचं समोर आला आहे. ३७ वर्षीय तरुणीचे नाव सोनाली बैत असे आहे तर तिच्या प्रियकराचे नाव महेश पांडे (२७) असे आहे. या दोघांवर अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
Pune Crime : पुण्यातील तीन ठिकाणी घरफोड्या; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज चोरला