संग्रहित फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, लोहटा (पश्चिम) येथील रहिवासी सुरेश रमेश चौधरी (वय ३२) हे ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास गावातील शिवारात होते. त्यावेळी आरोपी अशोक गुणवंत आडसुळ (रा. लोहटा पश्चिम, ता. कळंब) हा तेथे आला. त्याने सुरेश चौधरी यांच्याकडे जाऊन, “माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार का दिली?” असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर अशोक आडसुळ याने सुरेश चौधरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दोघांमधील वाद विकोपाला गेला असता, आरोपीने सोबत आणलेल्या कोयत्याने चौधरी यांच्या डाव्या हातावर जोरदार वार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताच्या पोटरीजवळ खोलवर जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला.
हे सुद्धा वाचा : दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली
दरम्यान, घटनेनंतर जखमी सुरेश चौधरी यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अशोक आडसुळ याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. यापूर्वीही दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यात ऐन दिवाळीत गुन्हेगारीचा थरार!
कोंढवा बुद्रुक परिसरातील साळवे गार्डनजवळ वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शुभम शरद शिंदे (वय २७, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रतन विठ्ठल खत्री (वय २४), सोमा गायकवाड, पंकज तिवारी, आकाश जमादार यांना अटक करण्यात आली. तर बंटी म्हस्के, समीर विद्यागज, संघर्ष सावंत, शैलेश भंगे, तन्मय सोनवणे यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून झालेल्या वादातून अशोक आडसुळ याने सुरेश चौधरी यांच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात सुरेश चौधरी गंभीर जखमी झाले.
Ans: ही घटना 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील लोहटा पश्चिम शिवारात घडली.
Ans: जखमी सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात संशयित अशोक आडसुळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.






