Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरीत एटीएम फोडून 20 लाखांची रोकड लांबवली; एटीएम मशीन गॅस कटरने कापले अन्…

चोरट्यांनी अतिशय शिताफीने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला आणि तेथील एटीएम मशीन गॅस कटरने कापून त्यातील तब्बल २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड पळवली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2026 | 12:12 PM
पिंपरीत एटीएम फोडून 20 लाखांची रोकड लांबवली; एकाच टोळीने रक्कम चोरल्याचा संशय

पिंपरीत एटीएम फोडून 20 लाखांची रोकड लांबवली; एकाच टोळीने रक्कम चोरल्याचा संशय

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच वेळी तीन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न.
  • देहूरोड आणि काळेवाडीतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न अपयशी
  • चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने कापून रोकड चोरली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये देहूरोड, काळेवाडी व पिंपळे गुरव या तीन ठिकाणी एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी देहूरोड व काळेवाडी येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. मात्र, पिंपळे गुरव येथील एटीएम फोडून चोरट्यांनी 20 लाखाची रोकड लांबवली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. तीनही ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये तपासणी केली असता एकच टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शहरात एकाच वेळी तीन एटीएम फोडण्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे .

पिंपळे गुरव येथे रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ श्वेतायान समृद्धी कॉलनीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर आहे. चोरट्यांनी अतिशय शिताफीने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला आणि तेथील एटीएम मशीन गॅस कटरने कापून त्यातील तब्बल २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड पळवली. पहाटेच्या वेळी घडलेल्या या चोरीच्या घटनेने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांनी मशीन कापतानाच ती जाळल्याचेही तपासात समोर आले असून, यामुळे मशीनचे मोठे नुकसान झाले आहे. चोरी करताना आपली ओळख पटू नये, यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला होता. याप्रकरणी तपब्रत जिबोतोष चक्रवर्ती यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याशिवाय, देहुरोड आणि काळेवाडी येथेही चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला. सांगवी, काळेवाडी व देहूरोड पोलीस यांनी एटीएम फोडणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पथक नेमले असून, पोलीस तपास करत आहेत.

आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यात यश आले आहे. आरोपींच्या मागावर पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

FAQ

१. पिंपरी-चिंचवडमध्ये किती एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या?
देहूरोड, काळेवाडी आणि पिंपळे गुरव अशा तीन ठिकाणी एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या.

२. चोरट्यांनी किती रक्कम चोरली?
पिंपळे गुरव येथील एटीएममधून २० लाख ३० हजार ८०० रुपये चोरले.

३. पिंपळे गुरवमध्ये एटीएम कसे फोडले?
चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लंपास केली.

Web Title: Atm broken into in pimpri rs 20 lakh in cash stolen nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • ATM Theft
  • Pimpri News

संबंधित बातम्या

RBI Compensation Rules : ATM मधून पैसे निघाले नाहीत? खात्यातून रक्कम कट झाली, RBI चा नियम जाणून घ्या
1

RBI Compensation Rules : ATM मधून पैसे निघाले नाहीत? खात्यातून रक्कम कट झाली, RBI चा नियम जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.