आंतरराज्य सोनसाखळी चोरट्याला अटक करून तब्बल १२ लाख ३१ हजार रुपये किमतीचे १०.३ तोळे सोने व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याने १५ गुन्हे केल्याची कबुली दिली.
कंपनीचे कार्यालय बहुतेक वेळा बंद असल्याची माहितीही पीडित कर्मचाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उलट पोलिसांना बोलावल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पिंपरी कॅम्पात १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास ओमकार जनरल स्टोअर्स येथे ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या संशयिताने दुकानात येत हिंदीतून 'दस वाला फ्रुटी दे!' असे म्हणत व्यावसायिकाला पिस्तूल…
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि परिणामी निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत दोन तासांची वाढ केली आहे.
कर संकलन विभागाच्या माहितीनुसार, १ लाख १२ हजार ८०९ निवासी मालमत्तांधारकांकडे सुमारे ३१० कोटी रुपये थकबाकी आहे. यामध्ये अनेक मालमत्तांधारक ५ ते १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून कर भरत नाहीत.
गणवेशातील दोन पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. फिर्यादीचे आयसीआयसीआय बँक खाते इतर दोन व्यक्तींशी लिंक असून त्याद्वारे मनी लाँड्रिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले.
ठेकेदाराने इमारतीच्या बाहेरील बाजूने मजुराच्या व पादचाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी संरक्षण जाळी लावली नाही. मजुरांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून डोक्याला हेल्मेट व हर्नेस दिले नाही.
चाकण येथील खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन खाजगी बस देहू फाटा येथून जात होती. दरम्यान, परळ डेपोच्या एसटी बसला खाजगी बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात खाजगी बसमधील 13 जण जखमी…
आरोपी दया बेलभंडारी हा पत्रा शेड येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये लघुशंका करत होता. फिर्यादी संदेश पवार यांनी त्याला रोखले असता आरोपींनी संदेश पवार यांच्यासोबत वाद घालून त्यांना बेदम मारहाण करत…
आरोपींनी आंदोलन करण्यासाठी पोलिसांची परवानगी न घेता 22 जून रोजी आंदोलन केले. झेंडे, लहान बोर्ड हातात घेऊन घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शितळा माता चौक दापोडी येथे आंदोलन केले.
सकाळच्या सुमारास काही नागरिकांना दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण ॲप विकसित करण्यात आले.
पूरजन्य परिस्थितीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना राहण्यासाठी शाळांचे नियोजन करा. नदीकाठी असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याने अशा नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन करा, असेही निर्देश दिले आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी किशोर परदेशी आणि जावेद बागसिराज यांना माहिती मिळाली कि, देहूगाव येथे काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने त्याच्या शेतामध्ये अफूची झाडे लावली…
बंद कॅमेर्यांमुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येत असून, नागरिकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मजुरी कामासाठी ताथवडे बस स्टॉप येथे थांबलेल्या एका मजुराने त्याच्या ओळखीच्या तरुणाला जेवण केले का, असे विचारले. त्या कारणावरून तरुणाने मजुरावर धारदार हत्याराने वार करत जखमी केले.