
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
तीन दिवसांपूर्वी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास कुळगाव बदलापूर पूर्व येथील सौजन्य अपार्टमेंटमधील रूम क्रमांक 105 मध्ये ही घटना घडली. त्या वेळी फिर्यादी आणि त्यांचा नातू हॉलमध्ये झोपलेले असताना त्यांचा मुलगा मिलिंद नारायण व्यापारी (वय 36) त्यांच्या जवळ आला. त्यांच्या पत्नीबरोबर झालेल्या संभाषणाचे मोबाईलमधील रेकॉर्डिंग कोणी डिलीट केले, या कारणावरून त्याने आईला झोपेतून उठवलं आणि वाद घालायला सुरुवात केली.
त्याने आईला शिवीगाळ करत त्यांच्या तोंडावर हाताने चापट्या मारल्या. आरोपीने आईला बेडवर ढकलून कपाटातील बनियनचा बोळा करून त्यांच्या तोंडात कोंबला आणि एका हाताने त्यांचा गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी मिलिंद व्यापारी फरार झाला.
शाळेत झाली ओळख, यूट्यूबवरून शिकून सुरू केला ड्रग्जचा धंदा; दोन शिक्षकांना पोलिसांनी केली अटक
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी उल्हासनगर गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई रामदास उगले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला अटक करणाऱ्या पथकात श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार मंगेश जाधव, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी आणि रामदास उगले यांचा समावेश होता. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस करत आहेत.
बदलापूर अंडाशय तस्करीचे धागेदोरे ५ राज्यांत! ३०० हून अधिक महिला बळी पडल्याचा संशय
गेल्या दोन वर्षांपासून बदलापूर हे सातत्याने बाल लैंगिक अत्याच्याराच्या प्रकरणामुळे सातत्याने चर्चेत आहे. अशातच बदलापुरातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बदलापुरात महिलांचे अंडाशय तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणामुळे अक्षरश: पोलिसांच्याही डोक्याला झिणझिण्या आल्या आहेत. हा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण बदलापुरात खळबळ माजली आहे.
गोरगरिब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना बदलापुरमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे रॅकेट महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशापर्यंत पसरल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे धागे-दोरे अनेक ठिकाणी पसरले असावेत, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून यात आणखी कोण कोण सहभाग आहे, याचाही तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
Beed Crime: पत्नीने नांदायला नकार दिल्याने संताप; जावयाने सासरच्या घराला पेट्रोल टाकून आग
Ans: बदलापूर (पूर्व) परिसरात ही घटना घडली.
Ans: मोबाईलमधील रेकॉर्डिंग कोणी डिलिट केले या कारणावरून मुलाने आईशी वाद घालत हल्ला केला.
Ans: उल्हासनगर गुन्हे शाखेने माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला अटक केली.