
Badlapur Crime school Van
आरटीओ (RTO) कडून कठोर कारवाई
याशिवाय आरोपीच्या स्कूल व्हॅनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासामध्ये आरोपीकडे अधिकृत आरटीओ परवाना (License) नसल्याचे निष्पन्न झाले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरटीओ विभागाने आरोपीला २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बालहक्क आयोगाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि शालेय वाहतुकीतील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी तपासण्यासाठी आयोगाकडून पावले उचलली जात आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिक्षण घेते. काल दुपारी नेहमीप्रमाणे ती दुपारी १२.३० वाजता स्कूल व्हॅनमधून घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने व्हॅन चालकाकडे फोनवरून विचारणा केली. साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी परतली. त्यावेळी ती खूप घाबरलेली होती. आईने तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याचे तिने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत व्हॅन चालकाला अटक केली आहे.
थाटामाटात लग्न झालं, पण पती निघाला नपुंसक; पत्नीसोबत शारीरिक संबंध टाळताना देत होता कारणं, अखेर…
ही चार वर्षांची चिमुकली नर्सरीत शिकत होती. पालकांना हा प्रकार कळला असता मुलीचे पालक आधी तिल घेऊन शाळेत गेले. शाळेच्या मुख्याध्यापिकेने व्हॅन चालकाला शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी चालक मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये शिरला असता चिमुरडी पुन्हा घाबरुन गेली आणि पालकांच्या पाठीमागे लपली. पालकांनी मुख्याध्यापिकेला परिस्थिती सांगितली पण त्यानंतरही तिने चालकाची बाजू घेतली. मुख्याध्यापिकेने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. यानंतर या प्रकरणातही राज्य सरकारने निर्देश देऊनही बसमध्ये महिला अटेंडंट नसल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या प्रकरणात आता बस चालकासह शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.