Badlapur crime news: बदलापुरात पुन्हा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार...; नेमकं घडलं काय?
कराड तालुक्यात 323 अर्ज वैध; 13 अर्ज अवैध, 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिक्षण घेते. काल दुपारी नेहमीप्रमाणे ती दुपारी १२.३० वाजता स्कूल व्हॅनमधून घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने व्हॅन चालकाकडे फोनवरून विचारणा केली. साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी परतली. त्यावेळी ती खूप घाबरलेली होती. आईने तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याचे तिने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत व्हॅन चालकाला अटक केली आहे.
ही चार वर्षांची चिमुकली नर्सरीत शिकत होती. पालकांना हा प्रकार कळला असता मुलीचे पालक आधी तिल घेऊन शाळेत गेले. शाळेच्या मुख्याध्यापिकेने व्हॅन चालकाला शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी चालक मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये शिरला असता चिमुरडी पुन्हा घाबरुन गेली आणि पालकांच्या पाठीमागे लपली. पालकांनी मुख्याध्यापिकेला परिस्थिती सांगितली पण त्यानंतरही तिने चालकाची बाजू घेतली. मुख्याध्यापिकेने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. यानंतर या प्रकरणातही राज्य सरकारने निर्देश देऊनही बसमध्ये महिला अटेंडंट नसल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या प्रकरणात आता बस चालकासह शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी
दरम्यान हा प्रकाराची माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यां चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या होत्या, राष्ट्रवादीच्या संगीत चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. मध्यरात्री बदलापूर अत्याचार प्रकरणातील तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली. फॉरेन्सिक टीमने व्हॅनची तपासणी करून पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.






