Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: बार्शीत रात्री थरारक नाट्य! पोलिसांनी जप्त केले तब्बल ‘इतक्या’ लाखांचे ड्रग्स; तिघांना अटक

एका हॉटेल समोर एका वाहनात मोठ्या प्रमाणात ड्रग असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचत एक चार चाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेतले आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2025 | 02:10 PM
Crime News: बार्शीत रात्री थरारक नाट्य! पोलिसांनी जप्त केले तब्बल ‘इतक्या’ लाखांचे ड्रग्स; तिघांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

बार्शी: बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत  गुरुवारी दि. १७ रोजी रात्री साडे अकरा वाजता सुमारे १४ लाख रुपयाच्या ड्रग्जच्या मुद्देमालासह एक पिस्तूल आणि तिघांना अटक केली आहे. शहरात देखील  ड्रग्ज सापडल्याने बार्शी शहर पोलीस दल सतर्क झाले आहे. याबाबत  संशयितांना बार्शी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १४ लाख रुपयाचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.

गुरुवार दि.  १७ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास परंडा रोड येथील एका हॉटेल समोर एका वाहनात मोठ्या प्रमाणात ड्रग असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचत एक चार चाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेतले आहे. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि पिस्तूलसह दोन जिवंत काडतूसे ताब्यात घेतले आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी गुन्हा दाखल केला आहे.  बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हसन दहलूज (वय ३७), रा. पल्ला गल्ली परांडा, मेहबूब मोहम्मद शेख (वय १९) (रा. बावची, ता. परंडा) आणि सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख (वय ३२ वर्षे रा. काझी गल्ली,  बार्शी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून याप्रकरणी एन. डी. पी. एस.  कायद्यानुसार शस्त्र कायदा, आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळून आले होते. याबाबत बार्शीच्या घटनेशी संबंध आहे की काय याबाबत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपाधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तपास करीत आहेत. पुण्यात मध्यवर्ती भागात ड्रग्स जप्त पुण्याच्या मध्यभागातून एका सराईताला पकडून पुणे पोलिसांनी नंतरच्या तपासातून एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड केलेले असताना आता नाना पेठेतून मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. छापेमारीत त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजारांचे एमडीसह इतर असा १३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pune Crime: पुणे पोलिसांची धडक कारवाई; मध्यवर्ती भागातून 11 लाखांचे मॅफेड्रॉन जप्त

अदीब बशीर शेख (२९, रा. नाना पेठ), यासीर हशीर सय्यद (३०, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात ड्रग्ज सप्लायरचे जाळे मोठ्याप्रमाणात वाढले आहे. या सप्लायरवर पुणे पोलिसांची नजर असली तरी ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहच होत असल्याचेही दिसून आलेले आहे. यापार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त व पेट्रोलिंग करत होते. त्यादरम्यान नाना पेठ भागात दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे एमडी असल्याची माहिती पथकाला मिळाली.

यानूसार, पथकाने परिसरात सापळा रचला. तसेच, संशयित दोघे दिसताच पथकाने शेख, आणि सय्यद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एमडी आढळून आले. दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, अंमलदार आझाद पाटील, मयूर सुर्यवंशी, साहिल शेख यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Barshi police seized 14 lakhs drugs and arrest three accused with pistol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Barshi
  • Barshi Police
  • Drugs News

संबंधित बातम्या

अमली पदार्थांपासून शालेय मुलांना दूर ठेवावे अन्यथा परवाना रद्द; पान टपरी व्यावसायिकांना दिला सज्जड दम
1

अमली पदार्थांपासून शालेय मुलांना दूर ठेवावे अन्यथा परवाना रद्द; पान टपरी व्यावसायिकांना दिला सज्जड दम

Crime News: गांजाची होम डिलिव्हरी करणारा अटकेत; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गांजा अटकेत
2

Crime News: गांजाची होम डिलिव्हरी करणारा अटकेत; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गांजा अटकेत

Fentanyl Crisis US : ‘हे’ औषध नाही, ही आहे अमेरिकेच्या विनाशाची सुरुवात; US-China मध्ये नव्या संघर्षाची चिन्हं
3

Fentanyl Crisis US : ‘हे’ औषध नाही, ही आहे अमेरिकेच्या विनाशाची सुरुवात; US-China मध्ये नव्या संघर्षाची चिन्हं

विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून अंमली पदार्थ विक्री; पोलिसांनी एकाला सापळा रचून पकडले
4

विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून अंमली पदार्थ विक्री; पोलिसांनी एकाला सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.