Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शस्त्राचा धाक, मद्य पाजून विवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप; भाजप नेते नरेंद्र पवारांसह दोघांवर गुन्हा

पतीसोबतचा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आश्वासन देत तिला बोलावण्यात आले. मात्र, बापगावातील खासगी ठिकाणी नेल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 17, 2026 | 01:03 PM
शस्त्राचा धाक, मद्य पाजून विवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप; भाजप नेते नरेंद्र पवारांसह दोघांवर गुन्हा

शस्त्राचा धाक, मद्य पाजून विवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप; भाजप नेते नरेंद्र पवारांसह दोघांवर गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • माजी आमदारावर गंभीर आरोप
  • दोघांविरोधात गुन्हा दाखल
  • बापगावातील घटनेने खळबळ
 

भिवंडी: पतीसोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय विवाहित महिलेला बोलावून भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील खासगी ठिकाणी नेले आणि तेथे शस्त्राचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा:दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

मध्यस्थीच्या बहाण्याने बापगावला नेल्याचा आरोप

तक्रारीनुसार, संबंधित महिलेचा पतीसोबत वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी नरेंद्र पवार यांनी तिला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी पवार आणि शैलेश पाटील यांनी तिला बापगाव येथील एका खासगी मालमत्तेवर नेल्याचा आरोप आहे. तेथे शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने मद्य पाजले आणि लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, रात्री सुमारे दोन वाजता पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील यानेही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पहाटेच्या सुमारास तिला घरी सोडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नगरसेविकेकडे मागितली मदत

घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून मदत मागितल्याचे वृत्त आहे. महिलेने तिच्याकडे कथित व्हिडीओ आणि मोबाईलवरील चॅट असल्याचे सांगितले. त्यानंतर कुलकर्णी यांनी महिलेला सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्यात धाव घेतली. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या प्रकरणाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर पडघा पोलिसांनी महिलेची तक्रार आणि उपलब्ध माहितीची पडताळणी करून गुन्हा दाखल केला.

हेही वाचा:Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर…’; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणात महिलेने केलेले आरोप, कथित डिजिटल पुरावे आणि घटनेशी संबंधित इतर बाबींची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. आरोपींची भूमिका, घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी कांचन कुलकर्णी यांनी केली आहे. ४८ तासांत अटक न झाल्यास महिलांना सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचे वृत्त आहे. पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत तक्रारीतील आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोष निश्चित करण्याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतच होणार आहे.

Web Title: Bhiwandi crime narendra pawar shailesh patil case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Bhiwandi Crime
  • Bhiwandi News
  • Bhiwandi police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.