Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! ‘आमराई रिसॉर्ट’मधील देहव्यापार रॅकेट उद्ध्वस्त

Pune Crime News: पुण्याच्या भोर तालुक्यातील वेळू येथील ‘आमराई रिसॉर्ट’वर राजगड पोलिसांनी अचानक धाड टाकली अन् एका मोठ्या रॅकेटचा भयंकर पर्दाफाश झाला! अवघ्या ₹१००० मध्ये चालणाऱ्या या गोरखधंद्यातून १३ तरुणींची सुटका झाली. या कारवाईने एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे..

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 25, 2026 | 03:28 PM
Pune Crime News: पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! 'आमराई रिसॉर्ट'मधील देहव्यापार रॅकेट उद्ध्वस्त

Pune Crime News: पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! 'आमराई रिसॉर्ट'मधील देहव्यापार रॅकेट उद्ध्वस्त

Follow Us
Follow Us:
  • भोरमधील ‘आमराई रिसॉर्ट’वर पोलिसांचा छापा; देहव्यापार उघड
  • विविध राज्यांतील १३ पीडित महिलांची सुटका
  • रिसॉर्ट राजकीय पदाधिकाऱ्याचे असल्याची चर्चा

Pune Crime News:पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेळू येथील एका रिसॉर्टवर राजगड पोलिसांनी अचानक छापेमारी करत मोठ्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. केवळ एक हजार रुपयांचे आर्थिक आमिष दाखवून महिलांकडून हा बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी या धडक कारवाईत देशातील विविध राज्यांतील तब्बल १३ तरुणींची सुरक्षित सुटका केली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी कारवाई कशी झाली?

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास राजगड पोलिसांनी भोर तालुक्यातील वेळू हद्दीतील ‘आमराई रिसॉर्ट’वर ही धडक कारवाई केली. गेल्या दोन महिन्यांपासून या रिसॉर्टमध्ये आरोपी रघु शेट्टी हा विविध राज्यांतील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या बातमीच्या आधारे राजगड पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला आणि रिसॉर्टवर एक डमी ग्राहक पाठवला. तिथे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची पूर्ण खात्री पटताच पोलिसांनी एकाच वेळी संपूर्ण रिसॉर्टला वेढा घालून छापा टाकला.

हेही वाचा: Double Murder Case: तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार! यवतमाळमधील दुहेरी हत्येने शहरभरात भीतीचे सावट

देशभरातील १३ तरुणींची सुटका; अवघ्या १,००० रुपयांत गोरखधंदा!

छापेमारीदरम्यान या रिसॉर्टमध्ये अवघ्या १००० रुपयांत हा अनैतिक व्यवहार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रिसॉर्टची कोम्बिंग ऑपरेशन पद्धतीने झडती घेतली. यावेळी तिथे सापडलेल्या मुंबई, ठाणे यांसह दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यातील तब्बल १३ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.

हेही वाचा: Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळा धंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

राजकीय पदाधिकाऱ्याचे रिसॉर्ट? चर्चांना उधाण!

दरम्यान, ज्या ‘आमराई रिसॉर्ट’मध्ये हा गंभीर प्रकार सुरू होता, ते रिसॉर्ट एका बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण भोर आणि पुणे तालुक्यात सुरू आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने हे रिसॉर्ट चालवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने दिले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या रिसॉर्टचे मुख्य मालक नेमके कोण आहेत? आणि या रॅकेटचे जाळे आणखी कुठे पसरले आहे? या सर्व बाजूंनी राजगड पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे आणि कोणत्या रिसॉर्टवर झाली?

    Ans: ही कारवाई पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील वेळू येथील 'आमराई रिसॉर्ट'वर राजगड पोलिसांनी केली.

  • Que: या कारवाईत किती महिलांची सुटका करण्यात आली?

    Ans: मुंबई, ठाणे, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातील एकूण १३ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.

  • Que: रिसॉर्ट चालवणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: गेल्या दोन महिन्यांपासून बळजबरीने देहव्यापार करून घेणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव रघु शेट्टी असे आहे.

Web Title: Bhor resort dehvyapar karvai velu amrai resort rajgad police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Latest pune news update
  • Raid News
  • sex worker

संबंधित बातम्या

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार
1

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

Cyber Crime: OTP नाही, लिंक नाही… तरीही बँक खातं रिकामं! सायबर चोरट्यांच्या ‘या’ नव्या डावाने उडाली झोप
2

Cyber Crime: OTP नाही, लिंक नाही… तरीही बँक खातं रिकामं! सायबर चोरट्यांच्या ‘या’ नव्या डावाने उडाली झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.