Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: OTP नाही, लिंक नाही… तरीही बँक खातं रिकामं! सायबर चोरट्यांच्या ‘या’ नव्या डावाने उडाली झोप

OTP नाही, लिंकवर क्लिक नाही... मग बँक खातं कसं रिकामं झालं? सायबर भामट्यांच्या या भयानक आणि नव्या डावाने पुणेकरांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 22, 2026 | 10:09 AM
cyber fraud

cyber fraud

Follow Us
Follow Us:
  • ओटीपी किंवा लिंकशिवाय खात्यातून पैसे चोरीला गेल्याने खळबळ.
  • ‘रिमोट एक्सेस’ आणि छुप्या मालवेअरद्वारे मोबाईलचा ताबा घेतल्याचे उघड.
  • सहकारनगर पोलीस आणि सायबर सेलकडून चोरट्यांचा कसून शोध सुरू.

पुणे: कोणताही वन टाईम पासवर्ड (OTP) शेअर न करता, अथवा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करता बँक खात्यातून लाखो रुपयांची रक्कम अचानक गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर भामट्यांनी ‘रिमोट एक्सेस’ किंवा मोबाईलमधील छुप्या ‘मालवेअर’च्या मदतीने ही रोकड दुसऱ्या खात्यात वळविल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

नागरिकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता एक नवी आणि धोकादायक पद्धत अमलात आणल्याचे दिसून येत आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित व्यक्तीला कोणताही ओटीपी किंवा लिंकचा मेसेज आला नव्हता. तरीही त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम अनाकलनीयपणे दुसऱ्या अनोळखी खात्यांमध्ये ट्रान्सफर झाली. पैसे कपात झाल्याचे मेसेज मोबाईलवर धडकताच संबंधित नागरिकाचे पाय पायाखालची जमीन सरकली.

तपासातील प्राथमिक माहिती

या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहकारनगर पोलीस आणि पुणे सायबर सेलने संयुक्तपणे तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार:

  • छुप्या मालवेअरचा वापर: मोबाईलमध्ये अनधिकृत ॲप्स किंवा सुरक्षित नसलेल्या वाई-फाई/वेबसाईटद्वारे छुपा मालवेअर (Malware) प्रवेश करतो.
  • रिमोट एक्सेस (Remote Access): या मालवेअरच्या आधारे हॅकर्स मोबाईलचा ताबा दूरवरून (Remote Access) मिळवतात.
  • विना-ओटीपी व्यवहार: फोनचा ताबा मिळाल्यामुळे स्क्रीनवरील हालचाली किंवा बँक ॲप्लिकेशनच्या गुप्त माहितीवर भामट्यांची नजर राहते, ज्यामुळे सहजरीत्या पैसे वळवणे शक्य होते.

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

आत्तापर्यंत डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी “ओटीपी किंवा लिंक शेअर करू नका” असे आवाहन पोलिसांकडून केले जात होते. मात्र, कोणतीही चूक न करता थेट बँक खात्यावर डल्ला मारल्याच्या या नव्या प्रकारामुळे सामान्य नागरिकांची चिंता आणि भीती कमालीची वाढली आहे.

पोलीस प्रशासनाचे आवाहन

या घटनेनंतर सहकारनगर पोलीस आणि सायबर सेलने संशयित चोरट्यांचा आणि तांत्रिक पुराव्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी नागरिकांना खालील दक्षतेचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे:

  1. मोबाईलमध्ये अनोळखी स्रोत (Unknown Sources) वरून कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका.
  2. मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम आणि बँकिंग ॲप्स नियमित अपडेट ठेवा.
  3. फोनमध्ये चांगल्या दर्जाचा अँटीव्हायरस वापरावा.
  4. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.
💡

Frequently Asked Questions

  • Que: OTP नाही, लिंकवर क्लिक नाही... मग बँक खातं कसं रिकामं झालं? सायबर भामट्यांच्या या भयानक आणि नव्या डावाने पुणेकरांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे.

    Ans: मोबाईलमधील छुप्या मालवेअर (Malware) आणि रिमोेअॅक्सेसचा ताबा मिळवून सायबर भामट्यांनी ही चोरी केली.

  • Que: अशा सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा?

    Ans: अनोळखी ॲप्स डाऊनलोड करू नका, फोन व बँकिंग ॲप्स नेहमी अपडेट ठेवा आणि संशय आल्यास १९३० वर तक्रार करा.

  • Que: ओटीपी किंवा लिंकशिवाय बँक खात्यातून पैसे कसे गेले?

    Ans: उत्तर: मोबाईलमधील छुप्या मालवेअर (Malware) आणि रिमोेअॅक्सेसचा ताबा मिळवून सायबर भामट्यांनी ही चोरी केली.

Web Title: Cyber fraud without otp pune sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Latest pune news update
  • Pune Cyber Fraud

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.