Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर अलीकडेच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात मोठं भगदाड पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले असून, या घटनेमुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पुतळ्याच्या डाव्या बाजूला असलेल्या चबुतऱ्याच्या लगत जमीन खचली असून, त्यामध्ये मोठे भगदाड पडले आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.
शिवरायांचा हा पुतळा अलिकडेच उभारण्यात आला असून, याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. मात्र, इतक्या कमी कालावधीतच चबुतऱ्याजवळील जमीन खचल्यामुळे या ठिकाणी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा आणि संपूर्ण बांधकाम प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. सरकारने या प्रकल्पासाठी कितीही दावा केला असला, तरी प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. स्थानिक प्रशासन किंवा संबंधित यंत्रणांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, लवकरच या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ब्रिटनचे ‘F-35B’ लढाऊ विमान भारतात उतरले; केरळमध्ये आपत्कालीन लँडिंगमागील नेमकं कारण काय?
नव्याने उभारण्यात आलेल्या ८३ फूट उंचीच्या भव्य पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळची जमीन खचल्याची घटना समोर आली असून, सोशल मीडियावर संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची खळबळ उडाली आहे. याआधी २६ ऑगस्ट २०२४ रोजी याच ठिकाणी उभारलेला ४० फूट उंचीचा मूळ पुतळा कामाच्या अत्यंत निकृष्ट दर्जामुळे कोसळला होता. त्यानंतर विरोधकांनी जोरदार राजकीय टीका करत सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने गाजावाजा करत मूळ जागेवरच शिवरायांचा नव्याने आणि अधिक भव्य पुतळा उभारला. या पुतळ्याची उंची तलवारीसह ८३ फूट असून, चबुतऱ्याची उंची १० फूट आहे.
या नव्या पुतळ्याचे अनावरण मे महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही आठवड्यांतच या पुतळ्याला लागून असलेली जमीन खचल्याचे स्पष्ट झाले आहे. चबुतऱ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडले असून, त्या परिसरातील संरचना धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कामाच्या गुणवत्तेवर आणि सार्वजनिक निधीच्या वापरावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक व शिवप्रेमींनी या घटनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिवरायांचा हा ८३ फूट उंच पुतळा मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला होता. विशेष म्हणजे याच जागेवर पूर्वी उभारण्यात आलेला पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला होता. त्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झालेल्या दुर्घटनेवरून मोठं राजकारण तापलं होतं.
त्या घटनेनंतर अवघ्या वर्षभरातच सरकारने नव्याने आणि अधिक भव्य स्वरूपात शिवरायांचा पुतळा उभारला. मात्र, नव्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने पुन्हा एकदा बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चबुतऱ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडले असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली असून, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थैर्याबाबत कुठलाही धोका नसल्याचे खात्रीने सांगितले आहे. तरीसुद्धा नागरिकांनी चिंता व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.