Pune News:लंडनमध्ये नोकरी गमावल्याचा दावा करणारा तरुण प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पुण्यातील मॉडर्न कॉलेजने शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपण लंडनमधील नोकरी गमावल्याचा आरोप प्रेमने केला होता.
प्रेमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कॉलेजच्या आवारात अनेक सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. मात्र, आता या प्रकरणात मॉडर्न कॉलेजच्या एका प्राध्यापकाने मोठा खुलासा केला आहे. प्राध्यापकाच्या म्हणण्यानुसार, प्रकरणात काही गैरसमज निर्माण झाले होते, ज्यामुळे घडलेल्या परिस्थितीचा वेगळा अर्थ लावला गेला.
कॉलेजचे प्राध्यापक श्यामकांत देशमुख यांनी सांगितले की, “प्रेम बिऱ्हाडे याची नोकरी गेलेली नाही. काल रात्री आम्हाला कंपनीचा मेल आला आहे. आम्ही त्या विद्यार्थ्यांची सगळी माहिती पाठवली आहे. चुकीची दिशाभूल केली जात आहे. आम्ही विद्यार्थ्याला विचारले नाही.”
देशमुख म्हणाले की, “काल आम्ही त्या विद्यार्थ्याशी संवाद साधला. कंपनीकडून कॉलेजला तीन मेल आले होते, पण त्यांनी अॅविएशन अॅक्टचा उल्लेख केल्यामुळे माहिती गोळा करण्यात उशीर झाला. त्यांनी आम्हाला पाच वर्षांचे रेकॉर्ड विचारले, परंतु आमच्याकडे केवळ तीन वर्षांचा रेकॉर्ड उपलब्ध होता. विद्यार्थ्याला कोणीही त्याची जात विचारला नाही,पण जर आमच्या कर्मचार्यात कोणीही दोषी आढळला, तर आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करू.”
‘प्रेम बिऱ्हाडेची नोकरी गेलेली नाही. काल रात्री आम्हाला पुन्हा एकदा कंपनीचा मेल आला आहे. आम्ही त्या विद्यार्थ्याची सगळी माहिती पाठवली आहे. पण त्यानंतरही दिशाभूल केली जात आहे. आम्ही विद्यार्थ्याला जात विचारली नाही. असही देशमुख यांनी सांगितले.
कॉलेजच्या माहितीनुसार, कॉलेजने प्रेम बिऱ्हाडे प्रकरणातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि विद्यार्थ्याला संबंधित सर्व प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. प्रेम बिऱ्हाडेचे प्रमाणपत्र १४ ऑक्टोबरलाच दिले गेले होते.पण सोशल मीडियाचा वापर करून तो कॉलेजची बदनामी करण्याचा प्रयत्न कर आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला. प्रेमची ही कृती बदनामी करणे, सायबर छळ करणे आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येते, असंही त्यांनी सांगितलं.
‘या’ कलाकाराने स्वतः ठरवली जन्माची तारीख,दसऱ्याशी खास नातं; ८ वर्षांपूर्वीच घेतला जगाचा निरोप!
लंडनमधील नोकरी गमावल्याचा दावा करणाऱ्या प्रेम बिऱ्हाडेने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे मोठा खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये प्रेम म्हणाला, “जय भीम सगळ्यांना. मी माझ्या कंपनीच्या बाहेर उभा आहे. माझ्या हातात आयडी कार्ड असून ते कंपनीत परत करायला निघालोय. कारण माझी नोकरी गेलीये. पुण्याच्या एका कॉलेजमुळे नोकरी गेलीये. माझ्या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं, मी त्यांचा विद्यार्थी होतो का? त्यावेळी कॉलेजने सांगितलं नाही.”
प्रेम म्हणाला की, “कॉलेजने माझ्या विद्यापीठाच्या अर्जाच्या वेळी दोनदा शिफारसपत्र दिलं होतं. या वेळेस त्यांनी काहीच सांगितलं नाही? कारण त्यांना आम्ही पुढे गेलेलो नकोय. फक्त हे आयडी कार्ड किंवा नोकरी नाही. हे माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या शिक्षकांचं, माझ्या समाजाचा कित्येक वर्षांचा संघर्ष होता.” व्हिडिओमध्ये प्रेमने या प्रकरणामुळे झालेल्या व्यक्तिगत आणि सामाजिक आव्हानांवर प्रकाश टाकला आहे.