
राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न; तब्बल 850 विद्यार्थ्यांचा सहभाग
लहान वयोगटातील विद्यार्थ्यांनी अवघ्या ३ मिनिटात १०० बेरीज – वजाबाकीचे प्रश्न अचूकरित्या सोडवून आपली गणितीय क्षमता सिद्ध केली आहे. तर मोठ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी ३ मिनिटात १०० बेरीज, वजाबाकी, २० गुणाकार व २० भागाकार अशा स्वरुपातील प्रश्न यशस्वरित्या सोडवून सर्वांचीच प्रशंसा मिळविली आहे.
ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्कर्ष क्रिएशन्सचे अमित शिंदे (सीईओ, संस्थापक) आणि संध्या शिंदे (सहसंस्थापक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्ष क्रिएशनच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध व्यवस्थापन व अथक परिश्रम घेत हा उपक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय केला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या उपक्रामाला विशेष महत्व प्राप्त झाल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी शिल्पा रंधवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आशुतोष पाटील व लीना पाटीलही उपस्थित होते. यासोबतच प्रगती इंटरनॅशनल स्कूलचे संचालक किशोर माने आणि प्रिती माने यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांना मिळालेला मोलाचा पाठिंबा हा उपक्रम यशस्वी ठरविल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मानसिक गणित कौशल्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ देणारी ही स्पर्धा सर्वार्थाने प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरली, असंही आयोजकांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : TET ने शिक्षकांचा पडणार तुटवडा? शिक्षण विभागाच्या आकडेवारीने गुरुजींच्या मनात भीती