Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?

Pune ZP Election: वैध ठरलेल्या अर्जांमध्ये जिल्हा परिषदेसाठी ३५८ पुरुष व २६७ महिला उमेदवार, तर पंचायत समितीसाठी ६२७ पुरुष व ४९५ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 23, 2026 | 05:56 PM
Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?
Follow Us
Close
Follow Us:

निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात 71 अर्ज बाद
अनेकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न अपूर्ण
आजपासून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू

पुणे: पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात चांगलीच गाळणी लागली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत तब्बल ७१ उमेदवारांचे एकूण ८६ अर्ज बाद झाल्याने अनेकांचे निवडणूक स्वप्न अधांतरीच राहिले. यात पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतील २४ आणि पंचायत समिती निवडणुकीतील ४७ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येने फुगलेले निवडणूक रिंगण आता थोडेसे मोकळे झाले आहे.

जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वयक डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेल्या २४ उमेदवारांचे २८ अर्ज, तर पंचायत समितीच्या ४७ उमेदवारांचे ५८ अर्ज छाननीत अपात्र ठरले. बाद झालेल्यांमध्ये जिल्हा परिषद उमेदवारांपैकी १९ पुरुष व ५ महिला, तर पंचायत समितीमध्ये २४ पुरुष व २३ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; ‘या’ मुद्द्यांवरच होणार लढत

दरम्यान, शुक्रवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २७ जानेवारीपर्यंत इच्छुकांना माघार घेता येणार आहे. मात्र, रविवार (दि. २५) सार्वजनिक सुट्टी आणि सोमवार (दि. २६) प्रजासत्ताक दिन असल्याने या दोन दिवशी माघार घेता येणार नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेवटच्या दिवसापर्यंत गणिते बदलण्याची शक्यता आहे. यंदा पुणे जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांच्या २१९ जागांसाठी तब्बल १,८०६ इच्छुकांनी २,३३५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी (दि. २२) झालेल्या छाननीनंतर ८६ अर्ज बाद झाले. परिणामी आता जिल्हा परिषदेसाठी ६२१ उमेदवारांचे ८२५ अर्ज आणि पंचायत समितीसाठी १,१२२ उमेदवारांचे १,४२४ अर्ज असे एकूण २,२४९ अर्ज वैध ठरले आहेत.

लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात

वैध ठरलेल्या अर्जांमध्ये जिल्हा परिषदेसाठी ३५८ पुरुष व २६७ महिला उमेदवार, तर पंचायत समितीसाठी ६२७ पुरुष व ४९५ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. वाढलेली महिला सहभागाची टक्केवारी यंदाच्या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. माघार प्रक्रियेनंतर २७ जानेवारी रोजी दुपारी तीननंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर प्रचाराचा खरा रंग चढणार आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी पुणे जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात नेमके कोण-कोण उरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pune zilla parishad elections 71 candidates were disqualified during scrutiny maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Zilla Parishad
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; ‘या’ मुद्द्यांवरच होणार लढत
1

पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; ‘या’ मुद्द्यांवरच होणार लढत

पुण्यातील पोलीस ठाणे होणार ‘ग्रीन पोलीस स्टेशन’; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
2

पुण्यातील पोलीस ठाणे होणार ‘ग्रीन पोलीस स्टेशन’; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न; तब्बल 850 विद्यार्थ्यांचा सहभाग
3

राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न; तब्बल 850 विद्यार्थ्यांचा सहभाग

Sindhudurga News: देवगडमध्ये भाजपाच्यावतीने १८ उमेदवारी अर्ज; सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापले
4

Sindhudurga News: देवगडमध्ये भाजपाच्यावतीने १८ उमेदवारी अर्ज; सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.