Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Acid Attack News: बिहारमधील सिवानमध्ये ॲसिड हल्ला! मुस्लिम तरुणाला जिवंत जाळलं

Bihar Acid Attack News: कुटुंबीयांनी त्याला तातडीने सिवान सदर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असताना अफसाना यांनी भावाला घटनेबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या घटनेत तीन जण सहभागी असल्याचे त्याने सांगितले

  • By anuradha sagar
Updated On: Nov 05, 2026 | 05:01 PM
Siwan Acid Attack Bihar, Mohammad Nadeem Hussain Siwan Murder

Siwan Acid Attack Bihar, Mohammad Nadeem Hussain Siwan Murder

Follow Us
Follow Us:
  • मोहम्मद नदीम हुसैन यांच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला
  • मोहम्मद नदीम हुसैनची अज्ञातांकडून निर्घृण हत्या
  • कुटुंबीयांचा रास्ता रोको
Acid Attack  Crime News: बिहारमधील सिवानमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जीबी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरैया गावात एका तरुणावर अॅसिड हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.सरैया गावातील रहिवासी मोहम्मद नदीम हुसेन (वय ३० वर्षे) यांच्यावर ॲसिड हल्ला झाला असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. मोहम्मद हुसैनच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकल्यानंतर त्याला त्याच्या दुकानात कोंडून ठेवण्यात आले आणि पेटवून देण्यात आले, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला आहे.

भावाच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून जाळल्याचा आरोप

मृताची बहीण अफसाना खातून यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना भावावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून त्याला जाळण्यात आले असून, दुकानाचे शटर बंद करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. माहिती मिळताच त्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यावेळी भावाची प्रकृती अत्यंत गंभीर होती.

ST Employees Bonus: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले

. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तो संशयितांची नावे सांगू शकला नाही, असे अफसाना यांनी म्हटले आहे.

मृतदेह रस्त्यावर ठेवून कुटुंबीयांचे आंदोलन

शवविच्छेदनानंतर मृतदेह चौकी हसन पंचायत परिसरातील अलावलपूर गावात आणण्यात आला. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह रस्त्याच्या मध्यभागी ठेवून आंदोलन सुरू केले. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच जीबी नगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Election Commission Announce SSR: सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त सुधारणा जाहीर

अफसाना खातून यांनी सिवानचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी येऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. भावावर ॲसिड टाकून, त्याला जाळून दुकानात बंद करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

एसडीओ आणि एसडीपीओ घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच सिवान सदरचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आशुतोष कुमार गुप्ता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) प्रांजल पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

एसडीओ आशुतोष कुमार गुप्ता यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, तपासात दोषी आढळणाऱ्यांना लवकरच अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Bihar acid attack horror 30 year old man thrown acid on locked burnt alive in siwan as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 05:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.