एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले परिवहन मंत्री?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज जाहीर केला.
ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका मंत्री सरनाईक यांनी यावेळी मांडली.
“एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले. “एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन आणि महामंडळ कटिबद्ध असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी अधोरेखित केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबरोबरच इतर आर्थिक आणि सेवा-संबंधित मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या उर्वरित प्रश्नांवर दिवाळीनंतर मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे बोनसची घोषणा झाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी इतर मागण्यांबाबत दिवाळीनंतर होणाऱ्या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, १० हजार रुपयांच्या बोनसच्या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीपूर्वी बोनस जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद घेण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर
Ans: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी उत्सवानिमित्त १० हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे.
Ans: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे.
Ans: कर्मचाऱ्यांच्या बोनससह इतर मागण्यांवर चर्चा झाली असून, उर्वरित प्रश्नांवर दिवाळीनंतर मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.






