चंदन मिश्रा हत्याकांडातील सर्व ५ शूटर्सची ओळख पटली, गोळीबार करताना तौसिफ बादशाह होता आघाडीवर
बिहारची राजधानी पटनातील पारस रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी चंदन मिश्राची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यानंतर बिहारचं राजकारणही तापलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असताना, पोलिसांनी तत्परता दाखवत पाचही शूटर्सची ओळख पटवली असून पोलिस छापे टाकत आहेत. लवकरच गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Thane News : ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त
चंदन मिश्राच्या हत्येत सहभागी असलेल्या ५ गोळीबार करणाऱ्यांपैकी, रुग्णालयाच्या आत पांढरा प्रिंटेड शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये टोपीशिवाय दिसणारा व्यक्ती तौसिफ बादशाह असल्याचं समोर आलं आहे. तौसिफ बादशाह सेंट करेन्स स्कूलमधून पदवीधर आहे आणि तो पटनाच्या फुलवारी शरीफ आणि नौसा भागात जमीन व्यवसायाशी संबंधित आहे.
तौसिफ लोकांना त्याचे नाव बादशाह म्हणून सांगात होता. कंत्राट घेतल्यानंतर तौसिफ बादशाहने चंदन मिश्राची हत्या केली आहे. तौसिफ व्यतिरिक्त, पोलिसांनी त्याच्या इतर चार साथीदारांचीही ओळख पटवली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं मागावर असून सतत छापे टाकत आहेत.
पाच आरोपींपैकी पहिला तौसिफ बादशाह, दुसरा आकिब मलिक, तिसरा सोनू, चौथा कालू उर्फ मुस्तकीम आणि पाचवा भिंडी उर्फ बलवंत आहे. यापैकी तीन गोळीबार करणारे फुलवारी शरीफचे रहिवासी आहेत. हॉस्पिटलमध्ये ते अगदी सहज प्रवेश करतात आणि हत्या करून त्याच सहजतेने निघून जातात, लाईव्ह व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. या दरम्यान, त्यांना रोखण्यासाठी कोणताही सुरक्षा रक्षक नव्हता.
ड्रग्जप्रकरणात निलंबित डॉक्टरसह तिघांना ठोकल्या बेड्या; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा अंमली पदार्थ जप्त
पारसमधील या गोळीबाराच्या घटनेनंतर समोर आलेल्या लाईव्ह व्हिडिओमुळे पोलिसांना तपासात मदत झाली. या व्हिडिओच्या आधारे गुन्हेगारांची ओळख पटवता आली आहे. आता पोलिस पुढील कारवाईत गुंतले आहेत. या पाच जणांनी चंदन मिश्राची हत्या कोणाच्या आदेशाने आणि का केली हे त्यांना बेड्या ठोकल्यानंतर समोर येण्याची शक्यता आहे.