Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मरायचं नाहीये पण बायको आणि सासूने…”, भाजप नेत्याने विष पिऊन संपवलं आयुष्य; मृत्यूपूर्वी शेअर केली व्हाईस रेकाॅर्डिंग

Crime News : पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून भाजप मंडळाचे अध्यक्ष विनोद मिश्रा यांनी विष पिऊन आपले आयुष्य संपवल्याची घटना समोर येत आहे. सासुरवाडीच्या घरासमोरच त्यांनी विषप्राशन केले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 05, 2026 | 11:06 AM
"मरायचं नाहीये पण बायको आणि सासूने...", भाजप नेत्याने विष पिऊन संपवलं आयुष्य; मृत्यूपूर्वी शेअर केली व्हाईस रेकाॅर्डिंग

"मरायचं नाहीये पण बायको आणि सासूने...", भाजप नेत्याने विष पिऊन संपवलं आयुष्य; मृत्यूपूर्वी शेअर केली व्हाईस रेकाॅर्डिंग

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून नेत्याने सासरच्या घरासमोर विष प्राशन केल्याची घटना.
  • मृत्यूपूर्वी व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये मानसिक छळाचे आरोप.
  • पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सासरच्या जाचाला कंटाळून भाजप नेत्याने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील नरेला भागातील भाजप मंडळ आणि बँक फील्ड मॅनेजर विनोद मिश्रा यांनी काैटुंबिक त्रासाला कंटाळत १ मे रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये विष प्राशन करत आपले आयुष्य संपवले. मुख्य म्हणजे सासरवाडीच्या घरासमोर जाऊन त्यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी सर्व घटना शेअर करत त्यांनी कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना एक व्हॉइस रेकॉर्डिंग देखील शेअर केला ज्यात त्यांना मृत्यूसाठी पत्नी आणि सासरच्या मंडळींना आरोपी ठरवले.

Nasrapur Crime News: छातीवर व्रण, तोंडात बोळा…! नसरापूर प्रकरणातील चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर

२ एप्रिल रोजी विनोद मिश्रा यांची पत्नी आरती लग्नाला जात आहे असं सांगत माहेरी गेली आणि परत आलीच नाही. पती विनोद मिश्री जेव्हा तिला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी गेले तव्हा पत्नीच्या कुटुंबियांनी त्यांना भेटू दिले नाही. यानंतर त्यांनी बर्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावले पण यावेळीही पत्नी तिथे हजर झाली नाही. बुधवारी ३८ वर्षीय विनोद त्याचा मित्र मनीषसोबत रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेला होता. गुरुवारी तेथून  परतल्यानंतर तो प्रसाद देण्याच्या निमित्ताने सासरच्या घरी गेला, जिथे पुन्हा त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. असा आरोप आहे की, भांडणानंतर त्याने घराबाहेर विषारी पदार्थाचे सेवन केले. यादरम्यान त्याने नऊ मिनिटांचा व्हॉइस रेकॉर्डिंग देखील बनवला ज्यात आपल्याला होणाऱ्या त्रासाचे त्याने वर्णन केले. यात त्याने म्हटले की, “मला मरायचे नव्हते, परंतु सासरच्या लोकांनी त्याचा इतका मानसिक छळ केला की त्याला हे पाऊल उचलावे लागले”.

विषप्राशन केल्यानंतर विनोदची प्रकृती खराब होऊ लागली ज्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्राने कुटुंबियांनी याची माहिती दिली. कुटुंबियांनी त्याला तत्काळ एलएलआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने शेअर केलेल्या व्हाईस रेकाॅर्डिंगमध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींनी आरोपी घोषित करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बर्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी रवींद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून पुरावा म्हणून व्हॉइस रेकॉर्डिंगचीही तपासणी केली जात आहे.

Karjat Crime : आधी लिंबू मिरच्या आणि आता अनैतिक संबंध; ग्रामपंचातीच्या निष्काळजीपणामुळे गावात चालतंय सेक्स रॅकेट ?

आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये काय म्हटले?

“मला सर्वांना सांगायचे आहे की, मला मरायचे नव्हते, पण माझ्या सासरच्या मंडळींनी माझ्या मृत्यूची संपूर्ण योजना आखली होती. त्यांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा कट रचला होता. त्यांनी माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली होती. यामध्ये माझी पत्नी आरती मिश्राची आई, मिथलेश कुमारी, तिचा भाऊ, विकास तिवारी, माझ्या मामाचा मुलगा, सुनील तिवारी, माझी बहीण, अंजू आणि तिचा नवरा यांचा समावेश आहे. मी खूप चांगले आयुष्य जगत होतो; प्रत्येक सण आणि वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचे कोणालाही दिसू शकत होते. माझी सासू बऱ्याच काळापासून माझा छळ करत होती. घराची तोडफोड करणे आणि माझ्या पत्नीची फसवणूक करणे हे तिच्यासाठी अगदी सोपे काम होते. माझी पत्नी तिच्या लहरीपणाला बळी पडायची आणि ती याचा गैरफायदा घ्यायची. तरीही, मी कसेबसे माझे कुटुंब एकत्र ठेवले होते. ही घटना २ एप्रिल रोजी घडली. मी सकाळी ऑफिसला जात होतो. माझी पत्नी स्वयंपाक करत होती. मी जेवून ऑफिसला निघालो. माझी पत्नी, मुलगी पिहू, मुलगा कार्तिक आणि अटल माझ्या घरी होते. माझी पत्नी पिहू, घरातील सामान आणि दागिने घेऊन निघून गेली. मी हात जोडून सर्वांना विनंती करतो की या लोकांना उघडकीस आणावे. माझ्या मृत्यूला सुनील तिवारी, सासू मिथलेश कुमारी, विकास तिवारी, बहीण अंजू आणि तिचा नवरा जबाबदार आहेत. आता माझ्याकडे काहीही उरले नसल्याने मी आत्महत्या करत आहे”.

 

Web Title: Bjp mandal president vinod sharma ended his life by consuming poison over wife and in laws harassment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • BJp leader
  • commit suicide
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
3

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.