Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप नेत्याची हत्या, मिरजमध्ये उडाली खळबळ

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मिरजमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मिरजमधील भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 09, 2024 | 04:56 PM
bjp Sudhakar Khade murder case in miraj

bjp Sudhakar Khade murder case in miraj

Follow Us
Close
Follow Us:
मिरज : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे जोरदार प्रचार व सभा सुरु आहेत. राज्यामध्ये देखील राजकारण रंगले आहे. मात्र मिरजमध्ये गंभीर घटना समोर आली आहे. भाजप नेत्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे (वय ५२, रा. मिरज) यांच्यावर आज सकाळी कुऱ्हाडीने सपासप वार करून निघृण खून करण्यात आला. जमीन विकासक म्हणून व्यवसाय करणारे खाडे आज सकाळी मिरज-पंढरपूर रस्त्यावर एका वादग्रस्त जमिनीत कुंपण घालण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. ऐन विधानसभा निवडणूक काळात घडलेल्या या हत्येने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी अधिकची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, खाडे यांनी पंढरपूर रस्त्यावरील पावणेचार एकर न्यायप्रविष्ठ असणारी जमीन विकसनासाठी घेतली होती. या जागेवर कुंपण मारण्यासाठी ते काही साथीदारांसोबत संबंधित शेत जमिनीमध्ये गेले होते. यावेळी शेत जमिनीचे कब्जे धारक आणि सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी संशयित आरोपीने कुऱ्हाडीने सुधाकर खाडे यांच्या मानेवर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
हे देखील वाचा : कॉंग्रेस दलित-ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लिमांना… ; अमित शाह यांचा खळबजनक आरोप
कुऱ्हाडीचा मानेवर वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सुधाकर खाडेंच्या खुनाच्या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली. तसेच खुनाची घटना मोबाईलमध्ये चित्रीत देखील झाली आहे. खाडे यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक प्रणील गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पथक दाखल होते.
हे देखील वाचा : महाराष्ट्र हा गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा…; जयंत पाटलांचा एल्गार
कारकीर्द वादग्रस्त
सुमारे वीस वर्षांपूर्वी खाडे मिरजेच्या राजकारणात सक्रिय झाले. सुरवातीला ते शिवसेनेत सक्रिय होते. त्या काळात त्यांनी मिरजेतील अवैध दारु, अवैध धंद्याविरोधात आंदोलन केले. त्यानंतर ते एका बलात्कार प्रकरणात अडकले. मिरज अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणातही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होते. काही वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये सक्रिय झाले होते.
अमित शाह यांचा प्रचार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. “कॉंग्रेस पक्षाला माहिती आहे की देश जेवढा कमजोर असेल तेवढी कॉंग्रेस मजबूत होईल. आणि देश यामुळे मजबूर होईल. मागच्या 75 वर्षांच्या इतिहास जाणून घ्या. कॉंग्रेस वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम करते. आणि हीच कॉंग्रेसची नीती आहे. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने कधीच दलित समाजाला एकजुट होई दिले नाही. आदिवासी आणि ST समादाला देखील वेगवेगळ्या जातींमध्ये वाटून टाकलं. त्यांची वेगळी ओळख निर्माण होऊ नये म्हणून अशी खेळी खेळली. भांडण लावून कोणाचा आवाज बुलंद होणार नाही, असा डाव कॉंग्रेसने खेळला. त्यामुळे कॉंग्रेसच्या या प्रवृत्तीपासून सावध राहावे लागेल,” असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

Web Title: Bjp udyog aghadi state president sudhakar khade was killed in miraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 04:56 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
1

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’
2

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट
3

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.