फोटो सौजन्य- सोशल मीडिया
विधानसभा निवडणुकाचा प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून आता सर्व प्रमुख नेत्यांचीही प्रचारसभा जागोजागी होत आहेत. महाराष्ट्रासोबत झारखंडच्याही विधानसभेचा प्रचार जोरदार सुरु आहे. तेथे महाराष्ट्रातील आरक्षणच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात विधानसभी निवडणुकीच्या अगोदर इंडिया उलेमा बोर्डने महाविकास आघाडीला समर्थन देताना 17 अटी समोर ठेवली आहे. ज्यामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
झारखंडच्या पलामू मध्ये प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेसवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, कॉंग्रेस ओबीसी (इतर मागास वर्ग) आरक्षणाच्या विरोधी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील उलेमासाठी 10 टक्के आरक्षणा देण्याचे आश्वासन दिले आहे. मी झारखंडच्या लोकांना विचारतो की, जर 10 टक्के आरक्षण मुस्लिमांना मिळाले तर कोणाचे आरक्षण कमी केले जाईल. कॉंग्रेस दलित, ओबीसी आणि मागासवर्गाचे आरक्षण काढून मुस्लिमांना देऊ इच्छिते. भाजप धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही. मी राहुल गांधींना इशारा देऊ इच्छितो की, भाजप कधीच अल्पसंख्याकांना आरक्षण देऊ देणार नाही.
मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे काम
अमित शाह मोदी सरकार आणि ओबीसी आरक्षणासंबंधी माहिती देताना म्हणाले की, “2014 मध्ये तुम्ही नरेंद्र मोदी सरकार स्थापन केले. मोदींनी सर्व केंद्रीय नोकऱ्या आणि परीक्षांमध्ये मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण दिले. मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे काम केले.
कॉंग्रेस ओबीसी विरोधी पक्ष
अमित शाह हे कॉंग्रेसवर ओबीसी आरक्षणावरुन आरोप करताना पुढे म्हणाले की, कॉंग्रेस ओबीसी विरोधी पक्ष आहे. 1950 मध्ये काका कालेलकर कमीशन बनला ज्याचा अहवाल कॉंग्रेस सरकारांद्वारे रद्द करण्यात आला. नंतर मंडल कमीशनची स्थापना झाली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी मंडल कमीशनचा विरोध केला.
शाह यांनी झारखंडमधून कॉंग्रेसवर केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराच्या मध्यात कॉंग्रेसला मुस्लिम, ओबीसी आणि आरक्षण या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न शाह यांनी केला आहे.
बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है
याअगोदरच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी बंटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता. भाजपकडून प्रत्येक ठिकाणी या नाऱ्याचा वापर निवडणुक कालावधीत केला जात आहे. काल नरेंद्र मोदी यांनीही एक है तो सेफ है असा नवा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपकडून हिंदु धर्मिंयांना वारंवांर या नाऱ्या द्वारे आवाहन केले जात आहे.