• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Madha Constituency Assembly 2024 Jayant Patil Targeted The Mahayuti

महाराष्ट्र हा गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा…; जयंत पाटलांचा एल्गार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माढ्यामध्ये सभा घेतली. या सभेमध्ये जयंत पाटील यांनी महायुतीचा आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 09, 2024 | 04:07 PM
ncp jayanat patil target mahayuti in madha sabha

माढा मतदारसंघामधील सभेमध्ये जयंत पाटील यांनी निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा व बैठका वाढल्या आहेत. शरद पवार गटाकडून सभा घेऊन जोरदार प्रचार केला जात आहे.  शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माढामध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्यातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेऊन  येथील रोजगार पळविला जात असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्य जणू गुजरातलाच आंदण दिले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार करून त्याची परिसीमा गाठणाऱ्या त्रिकुटाला पुन्हा सत्तेत बसवणे म्हणजे राज्याला अधोगतिकडे नेण्यासारखे आहे. हे राज्यातील जनतेने ओळखले आहे. सध्या निवडणूक आपल्या टप्प्यात आली असून विजयाचे मताधिक्य वाढवा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी उपळाई (ता.माढा) येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील यांनी आकडेवारीसह महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केली. या सरकारच्या धोरणामुळे राज्याच्या उत्पन्नात घट झाली असून भारताच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा 15 टक्के असणारा वाटा 13 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय 2014 पर्यंत दरडोई उत्पन्नात कायम गुजरातच्या पुढे आणि प्रथम चार क्रमांकात असणारे आपले राज्य आता गुजरातच्या खाली असून त्याची घसरण अकराव्या क्रमांकावर आली आहे. असा घणाघात जयंत पाटील यांनी केला.
हे देखील वाचा : शरद पवारांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का; पक्षामध्ये सामूहिक राजीनामा सत्र सुरुच
माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवार देण्यात आला आहे. अभिजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत विश्वास व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले की, अभिजित पाटील यांना शरद पवारांनी पूर्ण अभ्यास करून उमेदवारी दिली असल्याचे सांगून त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आबांनी पाच साखर कारखाने चालवण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. शिवाय त्यांच्याकडे विकासाचे व्हीजन असून गोरगरिबांची तळमळ आहे आणि तरुण आहेत. म्हणूनच शरद पवारांच्या विचारांच्या लढाईला साथ देण्यासठी त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या शासनाची पंचसूत्री विषयी सविस्तर माहिती दिली.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे महाघोटाळाचे ATM नाही होऊन देणार नाही…; पंतप्रधान मोदींचा अकोल्यातून एल्गार
निवडणूक एकतर्फी जिंकणार – अभिजित पाटील
यावेळी उमेदवार अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा मतदार संघाच्या विजयाचे व्हिजन मांडून अभिजीत पाटलाला मत म्हणजे शरद पवार साहेबांना मत असे सांगत ही निवडणूक आपण एकतर्फी जिंकू असा विश्वास व्यक्त केला. शरद पवार म्हणजे ऊर्जा तर जयंत पाटील म्हणजे संयम असा उल्लेख त्यांनी केला तेव्हा उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. माढ्याने लोकसभेला नवा खासदार दिला आता नवा आमदार देऊन येथील जनता इतिहास घडविणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Madha constituency assembly 2024 jayant patil targeted the mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 04:07 PM

Topics:  

  • jayant patil
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!
1

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’!  संजय राऊतांचा गंभीर आरोप
2

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’! संजय राऊतांचा गंभीर आरोप

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला
3

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप
4

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM
दिग्गज मराठी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, प्रविणा देशपांडे यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘तस्करी’ सीरिज ठरली शेवटची

दिग्गज मराठी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, प्रविणा देशपांडे यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘तस्करी’ सीरिज ठरली शेवटची

Feb 17, 2026 | 06:17 PM
ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

Feb 17, 2026 | 06:15 PM
फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी  Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

Feb 17, 2026 | 06:14 PM
Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Feb 17, 2026 | 06:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.