नागपूर-कोलकाता विमानाला बॉम्बची धमकी (फोटो-istockphoto)
नागपूर: सध्या देशात बॉम्ब ठेवल्याच्या अफवा पसरवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अनेक विमानतळे, विमाने यांच्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी सुरक्षा यंत्रणेला दिली जात आहे. दरम्यान इंडिगो कंपनीच्या एका विमानामध्ये अशाच प्रकारे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नागपूरवरून कोलकाताला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यानंतर विंनाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले.
नागपूरमधून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्समध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्राप्त झाली. त्यानंतर विमानाचे रायपूर विमानतळावर आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. बॉम्बने विमान उडवण्याची धमकी मिळताच एकाच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. इंडिगोचे विमान नागपूरमधून कोलकाताकडे निघाले होते. रायपूरमध्ये विमान उतरताच प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विमानांची तपासणी केली गेली. तसेच ही धमकी कुठून आली याबाबत चौकशी देखील केली जात आहे. या विमानातून १५० प्रवासी प्रवास करत होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
मुंबई विमानतळावर देखील पुन्हा मिळाली धमकी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे सत्र सुरुच आहे. अशातच एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळ T1 येथील CISF नियंत्रण कक्षाला फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली. यावेळी मुहम्मद नावाचा व्यक्ती मुंबईहून अझरबैजानला जात असून त्याच्याकडे स्फोटक सामग्री असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या माहितीनंतर सीआयएसएफने तात्काळ पोलिसांना सतर्क केले आणि अधिकाऱ्यांनी विमानतळावर आपत्कालीन तपास सुरू केला.
Raipur, Chhattisgarh: A flight from Nagpur to Kolkata made an emergency landing at Raipur airport following a bomb threat. The plane is being checked at the airport and further probe is underway: SSP Santosh Singh
— ANI (@ANI) November 14, 2024
ही माहिती मिळताच सीआयएसएफने सहार पोलिसांना माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने विमानतळावर आणीबाणी जाहीर करून तपास सुरू केला. 14 ऑक्टोबरपासून आतापर्यंत शेकडो विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत.विमानांवर बॉम्बच्या धमक्या मिळण्याचा हा ट्रेंड गेल्या काही महिन्यांत खूप वाढला आहे. 20 ऑक्टोबर रोजी विविध विमान कंपन्यांच्या किमान 14 फ्लाइटना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. दरम्यान, इंडिगोच्या सहा विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती, त्यापैकी तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती.
हेही वाचा: ‘मुहम्मद विमानात बॉम्ब घेऊन बसला…’, मुंबई विमानतळावर पुन्हा बॅाम्बने उडवण्याची धमकी
16 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या अकासा एअरच्या फ्लाइटला आणि मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. या काळात तीन दिवसांत इंडियन एअरलाइन्सच्या एकूण 12 फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. याशिवाय 27 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाला धमकावून विमान टेक ऑफ केल्यास एकाही प्रवाशाला जिवंत सोडणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर तपास केला असता तो तरुण खोटे बोलत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विमानाचे उड्डाण करण्यास विलंब झाला. 14 ऑक्टोबरपासून देशभरातील विविध विमानतळांवर शेकडो बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. या धोक्यांमुळे विमानतळ आणि विमान कंपन्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. प्रत्येक कॉलनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत आहेत.