Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: दोघांत तिसरा आला अन् जिवानीशी गेला! प्रेयसीच्या पतीची हत्या करताना प्रियकराचा मृत्यू

या घटनेनंतर पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ती पोलिस कोठडीत आहे. पती आणि प्रियकर या दोघांचाही जीव गेला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 12, 2025 | 12:45 PM
Solapur Crime: दोघांत तिसरा आला अन् जिवानीशी गेला! प्रेयसीच्या पतीची हत्या करताना प्रियकराचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर: सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली असून विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तिने आपला प्रियकरही गमावल्याचे समोर आले आहे.  पांगरी पोलिसांनी या प्रकरणात मयत गणेश अनिल सपाटे (वय 26, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (वय 35) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, रूपालीला अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी  सोलापुरातील ढाळे पिंपळगाव तलावात दोन मृतदेह सापडले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धक्कादायक सत्य समोर आले आहे. विवाहित महिलेने आपल्या पतीचा काटा काढण्यााठी प्रियकरासोबत योजना आखली.  ठरलेल्या प्लॅनिंगनुसार महिलेने पतीला तलावाजवळ बोलावले. त्यानंतर प्रियकराने पतीला उचलून थेट पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने जीव वाचवण्यासाठी धडपड करत महिलेच्या प्रियकराला मिठी मारली होती. त्यामुळे तोही पाण्यात पडला. जीव वचावण्याच्या धडपडीत दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेत तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

MPSC Exam : सरकारचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ, पुण्यात वातावरण पेटलं, आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट, पहा VIDEO

नेमकं काय आहे प्रकरण?

रूपाली पटाडे (वय 35) आणि शंकर पटाडे (वय 40) या दाम्पत्याने प्रेमविवाह केला होता. शंकर गाडीचालक तर रूपाली घरकाम करत होती. काही वर्षे सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, त्यांचं नातं तेव्हाच ढासळायला लागलं जेव्हा बार्शीमधील गणेश सपाटे (वय 26) रूपालीच्या आयुष्यात आला. रूपाली आणि गणेश यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. शंकरला याचा संशय आला आणि त्याने रूपालीला हे संबंध तोडण्याचा सल्ला दिला. पण गणेशच्या प्रेमात गुंतलेल्या रूपालीने पतीची एकही गोष्ट ऐकली नाही. उलट, पतीचाच काटा काढायचा ठरवला.

खुनाचा कट आणि मृत्यूचा नाट्यमय शेवट

18 फेब्रुवारी 2025 रोजी, रूपाली आणि गणेशने पती शंकरला हटवण्याचा प्लॅन आखला. त्या दिवशी गणेशने शंकरला मित्रांसह एका हॉटेलमध्ये नेले. तिथे मद्यप्राशन केल्यानंतर त्याला धाराशिव जवळ असलेल्या कलाकेंद्रात घेऊन जाण्याचे कारण सांगत गाडीतून बाहेर पडले. गणेशने पूर्वनियोजित पद्धतीने ढाळे पिंपळगाव तलावाजवळील पुलावर गाडी थांबवली. ‘पुलावर डान्स करूया आणि फोटो काढूया’ असं सांगून त्याने शंकरला पुलावर आणलं.

अमेरिकेने पाठ फिरवल्यावर युक्रेनला ‘या’ देशाचा भक्कम पाठिंबा; 580 दशलक्ष डॉलर्सचे लष्करी मदत पॅकेज जाहीर

पुलावर रात्री डान्स करत असतानाच गणेशने शंकरला खांद्यावर घेत पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंकरने गणेशला घट्ट मिठी मारल्यामुळे तोसुद्धा त्याच्यासोबत पाण्यात पडला. दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते आणि त्यामुळेच दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

तपासात उघड झालेला कट

या घटनेनंतर पोलिसांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने तपास सुरू झाला. रूपालीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर सत्य बाहेर आले. तिच्या कबुलीजबाबानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पांगरी पोलिसांनी गणेश सपाटे आणि रूपाली पटाडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, रूपालीला अटक करण्यात आली आहे. प्रियकर, पती आणि आता स्वतः रूपाली – तिघांच्याही आयुष्याचा दुर्दैवी शेवट या नात्यांतील फसवणुकीच्या गुंत्यात झाला.

Web Title: Boyfriend dies while killing girlfriends husband double murder solved in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Relationship issues
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला
1

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला

Solapur Crime: 50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या
2

Solapur Crime: 50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद
3

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.