• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Mpsc Exam Government Playing With Students Future Agitation Again In Pune

MPSC Exam : सरकारचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ, पुण्यात वातावरण पेटलं, आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट, पहा VIDEO

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल असून आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक बघायाला मिळाली. परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करता आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 12, 2025 | 12:06 PM
MPSC Exam: Government playing with the future of students, atmosphere in Pune heated, clash between protesters and police, watch VIDEO
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

MPSC Students : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्री अचानक स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा झाले होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नेहमीची सरकारच्या निर्णयाच्या जाचाला समोरे जावे लागत आहेत. यावेळी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारविद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  पुण्यातील विद्यार्थ्यांनी काल पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून शास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे. पण यामुळे पोलिस यंत्रणेची मात्र पुरती धावपळ उडाली आहे.

विद्यार्थ्यांवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालात उडालेला गोंधळ, तसेच या प्रक्रियेमध्ये दिसून येणारी अपारदर्शकता या गोष्टींमुळे नाराज स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शास्त्री रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आपला उद्वेग आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील गुणवत्तायादीत नाव न् आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.

हेही वाचा : Amit Shah Maharashtra Visit: अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शिंदे यांची भेट; मध्यरात्री बंद दाराआड खलबतं

पीएसआय पदांमध्ये वाढ करा..

महाराष्ट्र गट ‘ब’च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेसाठी राज्य सरकारकडून ४४१ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले होते. तेवेळी राज्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाकडून मागणीपत्र राज्य सरकारकडे परत  पाठवण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘पीएसआय’ पदांसाठी फक्त २१६ जागांचीच जाहिरात काढण्यात आली. त्यामुळे ४४१ पदांवरुन राज्य सरकारने २२५ जागा का कमी केल्या? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत असून पीएसआय पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी..

  • विद्यार्थ्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. अभ्यास करावा की आंदोलन हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दरवेळी आमच्या हक्कांसाठी आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. अशी भावना विद्यार्थी व्यक्त करत आहे.
  • आम्ही काही कुण्या पक्षाचे कार्यकर्ते नसून केवळ अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत. मात्र आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे अभ्यास सोडून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. ‘
  • महाराष्ट्रासारख्या देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या  राज्यात विद्यार्थ्यांवर वारंवार आंदोलनाची वेळ येत असेल तर ही दुर्दैवी आहे. यामुळे आयोगाला अधिक जबाबदार आणि कार्यक्षम बनवणे निकडीचे ठरते. त्याकडे सरकारने लक्ष्य द्यावे.
‘आयोग चुकत असतानाही रेटून नेण्याच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे. अभ्यास करावा की रस्त्यावर उतरून आंदोलनाची लढाई लढावी हा पेचप्रसंग विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा तोंडावर असताना उद्याचे राजपत्रित अधिकारी असणाऱ्या या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते हे दुर्दैव आहे.’ एक विद्यार्थी, एमपीएससी ‘विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाचा हा लढा असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची रास्त मागणी आहे. आयोगाच्या चुकांसाठी विद्यार्थ्यांचे वेळोवेळी नुकसान झाले आहे. त्यासाठी आम्हाला मुख्य परीक्षेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी आमची मागणी आहे.’  एक विद्यार्थिनी, एमपीएससी

पोलीस अन् आंदोलकांमध्ये झटापट..

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. मात्र हे आंदोलन बेकायदेशीरअसल्याचे  सांगून पोलिसांकडून विद्यार्थ्यांना उचलून नेण्यात आले. याबत आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगण्यात आले की,  “जवळजवळ दोन महिन्यांपासून पोलिस परवानगीसाठी परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्याकडे निवेदन देण्यात येत होते. मात्र, आम्हाला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळ करत असल्याने आम्हाला संविधानिक मार्गाचा अवलंब करावा लागला.” शुक्रवारी (ता. ११) पावणेनऊ वाजताच्या आसपास शास्त्री रस्ता येथील अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले. त्यानंतर साधारण सव्वानऊ वाजता पोलिसांचा फौज फाटा आंदोलन ठिकाणी आला. तेव्हा काही विद्यार्थ्यांना फरासखाना पोलीस ठाणे येथे नेण्यात आल. त्यामध्ये विद्यार्थी आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : CSK vs KKR : खुद्द ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ अडचणीत, थालाच्याच आऊट असण्या-नसण्यावर गोंधळ, पंचांवर प्रश्नचिन्ह..

परीक्षा पुढे ढकला..

राज्यसेवा परीक्षा 1 डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली आणि १२ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या सुधारित निकालामध्ये ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील ३१८ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. मात्र या निकालामध्ये देखील चुका असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेत कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील अनेक विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत आले नाही. त्यामुळे त्यांना  महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये धाव घ्यावी लागली. आयोगाच्या या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या तयारीचा अत्यंत  मौल्यवान असा  वेळ वाया गेला आहे. त्यामुळे संविधानाच्या अनुच्छेद १६ नुसार सर्वांना समान संधी मिळण्यासाठी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून यावेळी करण्यात आली आहे.

Web Title: Mpsc exam government playing with students future agitation again in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • MPSC Exams
  • mpsc jobs
  • MPSC Recruitment

संबंधित बातम्या

पुराने सोडले MPSC वर पाणी! राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली, या तारखेला होणार परीक्षा
1

पुराने सोडले MPSC वर पाणी! राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली, या तारखेला होणार परीक्षा

आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट
2

आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट

MPSC Exam :  शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी ‘KYC’ प्रक्रिया बंधनकारक
3

MPSC Exam : शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी ‘KYC’ प्रक्रिया बंधनकारक

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; 2024 परीक्षेची प्रवेशपत्रेही प्रसिद्ध
4

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; 2024 परीक्षेची प्रवेशपत्रेही प्रसिद्ध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.