Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: मध्यरात्री हत्येचा थरार! चेष्टा-मस्करीतून वाद आणि तरुणाची दगडाने ठेचून हत्या

सोलापुरात मोबाईलच्या किरकोळ वादातून 39 वर्षीय शेकुंबर नदाफ यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 09:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • समाधान नगर परिसरात मध्यरात्री खुनाची घटना
  • मोबाईल देण्या-घेण्याच्या वादातून भांडण वाढले
  • आरोपींकडून दगडाने मारहाण; तरुणाचा मृत्यू
सोलापूर: सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री एका 39 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वंडरलँड सिटी शेजारील एका बिअर शॉपीजवळ घडली आहे. मृत तरुणाचे नाव शेकुंबर महिबूब नदाफ (वय 39) असे आहे. चेष्टा-मस्करीतून मोबाईल देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याच वादाचा रूपांतर हत्येत झाला.

Lonavala News: टेकडीवर फिरायला गेला, पण परतलाच नाही! एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू

काय घडलं नेमकं?

सोमवारी मध्यरात्री शेकुंबर नदाफ यांचा श्रीकृष्ण देशमुख व मल्लीनाथ माशाळे यांच्याशी चेष्टा-मस्करीतून मोबाईल देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाला. मल्लीनाथ माशाळे याने शेकुंबरला हाताने चापटा मारल्या, तर श्रीकृष्ण देशमुख याने शिवीगाळ करत रागाच्या भरात मोठा दगड उचलून थेट शेकुंबरच्या डोक्यात मारला. हा वाद कधी हिंसक वळणावर गेला हे कळलंच नाही. डोक्याला दगड मारल्याने शेकुम्बर जागीच बेशुद्ध पडला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृतकाच्या पत्नी सायरा मेहबुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकृष्ण देशमुख व मल्लीनाथ माशाळे (रा. समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने जुना पुणे नाका परिसरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव हरीश भास्कर बंडी असे आहे. हरीशच्या कुटुंबियांनी त्याच्या प्रेयसीच्या घरच्यांवर आरोप केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आईने केले प्रेयसीच्या कुटुंबियांवर आरोप

हरिषच्या आईला मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी मोठा हंबरडा फोडला. माध्यमांशी बोलतांना त्यांनी आरोप केला की, “माझा मुलगा फक्त त्या मुलीला भेटण्यासाठी तडफडत होता, पण तिच्या पालकांनी त्याला भेटू दिले नाही.” मुलीच्या आई-वडिलांच्या आडमुठेपणामुळेच हरिषने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला असून या मृत्यूला त्यांनाच जबाबदार धरले आहे.

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय?

    Ans: शेकुंबर महिबूब नदाफ (वय 39).

  • Que: खून कशामुळे झाला?

    Ans: मोबाईलच्या किरकोळ वादातून भांडण वाढल्याने.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Solapur crime thrilling murder in the middle of the night a dispute over jokes and a young man was stoned to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
2

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
4

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.